कोरोनाची सामान्य लक्षणे दिसताच ताबडतोब टेस्ट करावी – सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे

0
227

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
  सध्या कोरोना महामारीने भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. हाॅस्पिटल मध्ये बेड मिळत नाही, आॅक्सिजन बेड मिळत नाही, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नंबर लागलेले आहेत. भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे सामान्य लक्षण दिसताच नागरिकांनी ताबडतोब कोरोना टेस्ट करावी पाॅझिटिव्ह असल्यास लवकरात लवकर इलाज झाल्याने पाच दिवसात आपण ठणठणीत बरे होता. त्यामुळे अंगावर दुखणे काढू नये. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी नागरिकांना केले आहे.
      जामखेड परिसरातील नागरिकांना आवाहन करताना सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी माझ जामखेड माझी जबाबदारी चा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करत म्हटले आहे की, कोरोना महामारी मुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे कोरोनाची सामान्य लक्षणे दिसू लागतात म्हणजे सर्दी, खोकला, ताप हातपाय गळणे हि लक्षणे जास्त दिवस दिसल्यावर ताबडतोब अॅटिजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्या लवकरात लवकर उपचार घेतल्याने आपण पाच दिवसात ठणठणीत बरे होतात. त्यामुळे अंगावर दुखणे काढू नका.
     कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरला आमदार रोहित पवार यांचे मोलाचे सहकार्य आहे. आॅक्सिजन पुरवठा आमदार रोहित पवार करत आहेत. जामखेड मध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहाशे बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारले आहे त्यामुळे कोरोनाची सामान्य लक्षणे दिसताच न घाबरता
ताबडतोब टेस्ट करा कोरोनाचे दुखणे अंगावर काढू नका लवकरात लवकर उपचार घेतल्याने पाचच दिवसात ठणठणीत बरे होतात. कोणाला काही अडचण आल्यास आमदार रोहित (दादा) पवार व सावळेश्वर गृप आपल्या पाठिशी ठामपणे आहोत तेव्हा न घाबरता टेस्ट करा व लवकरात लवकर बरे व्हा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केले आहे.
           चौकट
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरला परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असेही आवाहन आजबे यांनी केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील बीड जिल्ह्य़ातील कर्हेवडगाव च्या ग्रामस्थांनी आरोळे कोविड सेंटरला पंचवीस क्विंटल धान्य गहु, तांदुळ, ज्वारी, बाजरी याची मदत केली आहे यावेळी रमेश आजबे, सरपंच, ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here