जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेनं राज्यात थैमान घातले आहे. कोरोना बाधीतांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय करोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यातच नगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जामखेड पोलिस दलानेही आता पुढाकार घेतला आहे. जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दिनांक ०१ मे रोजी जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


शिबीर महावीर मंगल कार्यालयात पार पडणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून मानवतेच्या कार्याचा भाग बनावे असे अवाहन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे. जगातील सर्वश्रेष्ठ दान रक्तदान समजले जाते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे याचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. समाजिक दातृत्वाबद्दल गायकवाड यांना खाकी वर्दीतील देवमाणूस, खरा समाजसेवक अशा अनेक उपाध्या लावण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

