जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मध्ये देवदूत म्हणून काम करणारे खरे समाजसेवक
डॉ. शोभा अरोळे व डॉ. रवी आरोळे यांना कोवीड सेंटर मध्ये रात्रंदिवस सहकार्य करणारे डॉ. प्रशांत खंडागळे व सुलताना शेख (भाभी) हे कोरोना काळात खरे आरोग्य दूत म्हणून काम करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत या कोविड सेंटर मधुन साडेपाच हजार रूग्ण बरे झाले आहेत तेही मोफत
कोरोना काळात अनेकांना जीवदान देणारे देवदूत आरोळे भाऊ बहीण

कोव्हिड रूग्णासाठी दवाखान्यात जागा मिळत नाही. आॅक्सिजन आणि औषधांचा टुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत जनता हवादिल झाली असताना जामखेड शहरात गेल्या वर्षापासून कोव्हिड सेंटर मध्ये निशुल्क आदर्श आरोग्य सेवा चालु आहे. आता पर्यन्त चार हजार रूग्ण औषधोपचारासह घरी सुखरूप गेले आहेत. कारण येथील कर्मचारी मंडळी हे एक परमेश्वराचे काम आहे ही मिशनरी सेवा आहे ही जाणीव ठेवत येथे काम करताना दिसत आहे. यात सर्वात पुढे आरोग्य सेवेला वाहून घेतलेले डॉ प्रशांत खंडागळे व सर्व रूग्ण व कर्मचारी वर्गाला चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची सोय करणार्या सुलताना शेख (भाभी) व त्यांचे सर्व सहकारी यांचा उल्लेख करावा लागेल. हे सर्व देवदुत रात्रंदिवस कशाची ही परवा न करता कोवीड रूग्णांना सेवा देत आहेत.
डॉ. प्रशांत खंडागळे
लहानपणी आजारात पायावर परीणाम झाल्याने थोडे अस्थिव्यंग आल्याने ते थोडे लंगडत चालत सर्व कोव्हिड सेंटर मध्ये जातीने सर्व रुग्णांची सेवा करत आहेत. आर्थिक परिस्थिती नाजुक असून ही त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूरे केले. वडीलांची इच्छा होती डॉ प्रशांत यांनी स्वतंत्र आपली प्रॅक्टिस सूरू करावी. या साठी वडीलांनी मोटारसायकल घेऊन दिली. राजूरी गावात प्रॅक्टिस केली पण मन काही रमत नव्हते. जामखेड शहरात दोन ठिकाणी प्रॅक्टीस सूरू केली पण कोठेच मन लागत नव्हते. तेव्हा प्रशांतच्या आईने डॉ शोभा आरोळे यांना सांगून येथे काम करावे असे ठरले. डॉ प्रशांतला पण आवडत होते कम्युनिस्ट ट्रेनिंग, सहा महिन्याचे इन्टरनॅशनल ट्रेनिंग पुर्ण करुन खेड्यात जावून सेवा सुरू झाली.
अशा या आदर्श आरोग्य सेवेला डॉ प्रशांत यांनी वाहून घेतले आहे ते आज पर्यत. त्यांचे वडील प्रकाश खंडागळे आई ग्रेटाबाई यांनी ही या संस्थेत ३२ वर्षे आपले योगदान दिले आहे त्यामुळे आईची धार्मिक शिकवणीतून या सेवेला डॉ प्रशांत यांनी वाहून घेतले आहे. खुप अडचणींतून ते आपली रूग्णांची सेवा करत आहेत. कोव्हिड सेंटरला अनेक रूग्ण, सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, तलाठी, ग्रामसेवक, पत्रकार आदी मान्यवर येथे उपचारादरम्यान होते. त्या सर्वांनी डॉ प्रशांत यांची आरोग्य सेवा जवळून पाहिली आणि खूप कौतुक केले आहे. शांत मीतभाषी कधी ही कोणाला न बोलता आपले काम चोख करणे हे डॉ प्रशांत यांचे ध्येय आहे. डाॅ शोभा आरोळे व रवी आरोळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा खरोखर आरोग्य सेवेचा दूत म्हणून डॉ प्रशांत खंडागळे यांनी जनतेची मने जिंकली आहे.
डॉ. आरोळे कोवीड सेंटरला डॉ. प्रशांत खंडागळे यांच्या बरोबरीने २४ तास सुलताना शेख या कोवीड सेंटरमधील ७५० रूग्ण, नातेवाईक व सर्व स्टापचे दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहापाणी ही सर्व जबाबदारी पार पाडत आहेत तसेच कोविड रूग्णाची देखभाल पार पाडीत आहे यामुळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे यांना हॉस्पिटलमधील रूग्णांची सेवा पूर्ण वेळ देता येत आहे. सुलताना शेख यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह कायम आहे.
सुलताना भाभी
सुलताना भाभी या गेल्या तेरा महिन्यांपासून आरोळे कोविड सेंटर मध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्ण व नातेवाईकांना चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची सोय करतात शंभर दिडशे ताटापासून सुरू झालेला प्रवास आठशे ताटापर्यत गेला आहे. आरोळे कोविड सेंटर मध्ये जसे औषधोपचार मोफत दिले जातात तसेच चहा नाष्टा व दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते यासाठी सुलताना शेख भाभीची अन्नपूर्णा टीम रात्रंदिवस राबत असते. ग्रामीण आरोग्य प्रकल्प परिसरातील कोणीही उपाशी राहणार नाही याची खबरदारी अन्नपूर्णा टीम घेते. डॉ. प्रशांत खंडागळे व सुलताना भाभी या आरोग्य दूतामुळे डॉ. शोभा अरोळे व डॉ रवी आरोळे हे कोरोना रुग्णांची चांगली सेवा करता येते.
या हॉस्पिटलमधे आरोग्यदूत म्हणून काम करीत असलेले असिफ पठाण, शहाबाई कापसे, सुचिता घोरपडे, समीर शेख, अशिष खंडागळे, सुवर्णा खंडागळे, दिक्षा बुक्ता, भारती गायकवाड, अराफत शेख, जाफर शेख, संजय कोल्हे, ऊमा कोल्हे, भिमा पवार, महेंद्र भालेराव हे कोवीड रूग्णांची सेवा सामाजिक भावनेतून मागील एक वर्षापासून काम करत आहेत या सर्व कोवीड योद्धांना मानाचा मुजरा

डॉ. शोभा अरोळे व डॉ. खंडागळेना कोरोना
मागीलवर्षी पासून कोवीड रूग्णांची सेवा करत असलेले
डॉ. शोभा अरोळे व डॉ. प्रशांत खंडागळे यांची रविवार रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी वर्षभर सेवाभावी वृत्तीने कोवीड रूग्णाची सेवा केली आहे त्यामुळे ते या आजारातून सहीसलामत बाहेर पडतील व रूग्णाची सेवा करतील असा आशावाद तेथील कर्मचारी यांनी व्यक्त केला आहे.

शासनाने विमा उतरवावा
डॉ. आरोळे कोविड हॉस्पिटलमधील ४० च्या आसपास अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस रूग्णाची सेवा करत आहेत ते शासनाला एकप्रकारे मदत करीत असल्याने या सर्व कर्मचा-यांचा ५० लाखाचा विमा शासनाने उतरावा अशी मागणी वंचीत बहुजन महासंघाचे सरचिटणीस डॉ. अरूण जाधव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.