मातृशक्तीचा जामखेडमध्ये भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर, शाहिरीचा कार्यक्रम, भव्य दिव्य मिरवणूक व धनंजय (भाई) देसाई यांचे व्याख्यान संपन्न

0
193

जामखेड न्युज——

मातृशक्तीचा जामखेडमध्ये भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर, शाहिरीचा कार्यक्रम, भव्य दिव्य मिरवणूक व धनंजय (भाई) देसाई यांचे व्याख्यान संपन्न

जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये महिलांनी अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद होत्या तर जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात २१० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिवसेनेच्या वतीने हे नववे वर्ष आहे तर महिला आयोजित शिवजयंतीचे हे दुसरे वर्ष आहे. गुरूवार दि. ९ रोजी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी आठ वाजता झी मराठी, स्टार प्रवाह, झी टॉकीज, सह्याद्री वाहिनी, कलर्स मराठी, एबीपी माझामाझा इत्यादीवर सादरीकरण तसेच झी मराठी पाऊल पडती पुढे चे विजेते आंतरराष्ट्रीय क्रिर्तीचे शाहिर सम्राट देवानंद माळी यांचा कार्यक्रम झाला. 

शुक्रवार दि. १० रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड पासून ऐतिहासिक भव्य पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली यात पारंपरिक वेशभूषा, घोडेस्वार, लाठी काठी, तलवार बाजी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. सायंकाळीशिवप्रतिमा पुजन व सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी सात वाजता हिंदूराष्ट्र सेनेने संस्थापक अध्यक्ष मा. धनंजय (भाई) देसाई यांचे
व्याख्यान झाले.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गणेश मंदीरापासुन महिला मिरवणुकीस प्रारंभ झाला सर्व महिला भगिनींनी डोक्यावर भगवे फेटे परिधान केले होते या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाल शिवरायांची वेशभूषा केलेले बालके राजमाता जिजाऊ यांच्या वेशातील जिजाऊ घोड्यावर स्वार झालेल्या होत्या ही मिरवणूक सायंकाळी आठ वाजता लक्ष्मी आई चौकात आली व मिरवणुकीचे रुपांतर सभेमध्ये झाले.यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई यांचे व्याख्यान झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की भगवतगिता रचली गेली त्यावेळी भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शक होते व अर्जुन योध्दा होता परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी या दोन्ही भुमिका स्वराज्यासाठी पार पाडल्या आहेत भगवत गिता नाही वाचता आली तरी शिवचरित्र मात्र आपण वाचले पाहिजे शिवचरित्र म्हणजे जिवंत भगवतगिता आहे.

तसेच महाराष्ट्र म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे आठरा पगडजातीचा आहे भारत देशाला ज्या वेळी पारतंत्र्यातचा कलंक लागण्याची भिषण परिस्थिती येईल त्या वेळी हा महाराष्ट्र कणखरपणे देशसंरक्षणासाठी उभा राहिला आहे शिवजयंती म्हणजे आपल्या सार्वभौम सामर्थ्यचे शाश्वत सत्य आहे.

या उत्सवाच्या आयोजिकारोहिनी काशिद म्हणाला की लाखो मावळ्यांनी आपले रक्त सांडुन जे स्वराज मिळविले आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजन केले आहे हा कार्यक्रम महिलांनी आयोजित केलेला आहे कारण शिवराय जन्माला यायचे असतील तर समाजात प्रथम जिजाऊ आई साहेब तयार झाल्या पाहिजेत आजच्या काळात औरंगजेबाचे विचार घेऊन काही लोक हिंदू धर्माला कीड लावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना ह्याच मातीत गाण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी पंचायत समितीच्या मा. सभापती आशाताई शिंदे,अँड स्वातीताई काशिद, सारोळा गावच्या सरपंच रितु काशिद, संध्या सोनवणे, मराठा गौरव युवराज काशिद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, उद्योगपती रमेश गुगळे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, नगरसेवक महेश निमोणकर, नगरसेवक बिभीषण धनवडे, पांडुरंग भोसले, गणेश काळे, आदर्श शेतकरी अविन लहाने. व संजय काशिद मित्रमंडळाचे पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रोहिणी काशिद यांनी केले सुत्रसंचालन हनुमंत महाराज निकम, ज्ञानेश्वर कोळेकर, केशव कोल्हे यांनी केले तर स्वातीताई काशिद यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here