भाजपाचा पक्षांतराबाबतचा भुकंप पेल्यातील वादळ – सरपंच हनुमंत पाटील
कोणी कितीही गप्पा मारल्या तरी २०२४ ला आमदार रोहित पवारच होणार
मागील आठवड्यात भाजपतर्फे कर्जत- जामखेड तालुक्यात मोठा राजकीय भुकंप होणार म्हणून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या पण भाजपाचा पक्षांतराबाबतचा भुकंप पेल्यातील वादळ ठरले आहे. कारण कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेला चांगलेच कळून चुकले आहे की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत. तीही दर्जेदार त्यामुळे कोणी कितीही गप्पा मारल्या तरी २०२४ विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार हेच भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास सरपंच हनुमंत पाटील यांनी जामखेड न्युजशी बोलताना व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकारणात असतांना विचारभिन्नता असणे स्वाभाविक आहे पण विचारांची शून्यता नसू नये हेच कालच्या पक्षांतराबाबत दिसत आहे.
विकास कामांमुळे रोहितदादांना कधीच कोणासमोर झुकण्याची आवश्यकता नाही इतिहास हा लोडावर टेकून अत्तराचा सुगंध घेत लिहिला जात नाही तर तो परिश्रमाच्या घामाच्या धारांनी लिहिला जातो.
कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात म्हणून विकास करतांना दोन्ही बाजू पहिल्या जातात पण रोहितदादांच्या बाबतीत चांगल्या बाबी ठळकपणे अधोरेखित होतात. म्हणूनच पक्षांतराबाबतचा हा भुकंप पेल्यातील वादळ ठरले हे नक्की
या पार्श्वभूमीवर इतकेच नमूद करावेसे वाटते की येणारी विधानसभा २०२४ निवडणूक आमदार रोहितदादांचीच असेल यात तिळमात्र शंका नाही. आणि ही निवडणूक केवळ आणि केवळ विकासावरच लढविली जाईल हेही निश्चित..! आहे असे सरपंच हनुमंत पाटील यांनी सांगितले.