जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत यामध्येच ग्रामिण भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामिण भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळुन येत असल्याने सामान्य लोकांना राशन दुकानातुन थम(अंगठा) देऊन धान्य घेणे होत नाही त्यात एकाच ई- पास मशीनवर कोरोनाच्या परिस्थिती किती जणांचे अंगठे घ्यायचे?हाहि प्रश्न असून सध्या अंगठा न लावता धान्याचे वाटप करण्यात यावे अशी मागणी किरण बेबी रविंद्र जावळे यांनी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत या पार्श्वभुमीवर कुटुंबातील कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्या कुटुंबातील व्यक्तींना घराबाहेर पडणे शक्य होत नाही अशामध्ये जर पाॅझिटिव्ह रुग्ण हे कूपन दुकानावर धान्य आण्यासाठी गेल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्यांची खुप शक्यता त्यामुळे या कोरोना परिश्यिती मध्ये थम हाताचा अंगठा न घेता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे त्या महिन्यांचे धान्य देण्याची सोय शासनाने करावी जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होणार नाही या बाबत दक्षता घेता येईल व होणारा कोरोना संसर्ग टाळता येईल त्यामुळे शासनाने तातडीने आदेश काढुन याबाबत कार्यवाही करावी अशी किरण बेबी रविंद्र जावळे यांनी केली आहे.

