जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्याची लोकसंख्या ४५ हजार आहे पण तालुक्यासाठी आज फक्त १३० डोस आले होते. सकाळी सात वाजल्यापासून लोक आॅनलाईन करण्यासाठी रांगेत उभे होते यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. लोकांची धक्काधक्की होत होती. या लोकांमधे एखादा कोरोना रूग्ण असेल तर मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे जामखेड तालुक्यासाठी जादा लस द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
४५ हजार लोकसंख्येच्या जामखेड तालुक्यासाठी अवघे १३० लसीचे डोस उपलब्ध झाल्याने साहजिकच मंगळवारी अभूतपुर्व गोंधळ येथील ग्रामीण रूग्णालयात पाहायला मिळाला. साधारण सातसे पेक्षाही अधिक लोक सकाळपासूनच लस घेण्यासाठी रांगेत उभे होते.मात्र लसीचा तुटवडा आणि रूग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा फटका लोकांना बसला आहे. ही बाब सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संदिप सांगळे यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोरोना लसी साठी लोकांचे हाल करू नयेत , जास्तीत जास्त पुरवठा करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी सुरवातीपासूनच आग्रही भूमिका घेतली आहे. मंगळवारी मात्र लसीअभावी अनेक लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत कोठारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांच्याशी संपर्क साधून ,ही बाब निदर्शनास आणून दिली व याबाबतची तक्रार केली.
यावेळी कोठारी म्हणाले, मंगळवारी जामखेड शहरासाठी फक्त १३० लसीचे डोस उपलब्ध झाले. मात्र लस घेण्यासाठी ७०० पेक्षाही अधिक लोक आले. या लोकांना उन्हात रांगेत उभे राहावे लागले. या लोकांना रांगेत उभे राहण्यासाठी कुठे सावलीचीही सोय नव्हती. गर्दीमुळे कोरोना वाढण्याचीच जास्त शक्यता असल्याने ,पर्यायी व्यवस्था म्हणून येथील ग्रामीण रूग्णालयाने टोकन सिस्टीम राबवावी .जेणेकरून गर्दी न होता लोकांना सोईस्कर लस मिळेल.
चौकट
सध्या देशात सगळीकडेच कोरोना लसीचा तुटवडा आहे . त्यासाठी आपण काही करू शकत नाही, अजून तरी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध नाही. जादा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास जामखेडला जास्तीत जास्त लस देण्यात येईल.
– डाॅ.संदिप सांगळे
जिल्हा आरोग्य अधिकारी
अहमदनगर

