जामखेड न्युज——
कर्जत जामखेड मधील ११४ गावातील पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक जाहीर
कर्जत जामखेड तालुक्यातील 114 गावातील पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जामखेड तालुक्यात ४८ तर कर्जत तालुक्यात ६६ काही ठिकाणी रिक्त तर काही ठिकाणी नवीन पदे आहेत. त्यांच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे आहे.
१३ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल
१४ मार्च ते २४ मार्च पर्यंत अर्ज भरणे
अर्जाची छाननी २८ मार्च ते २९ मार्च रोजी
पात्र उमेदवार यादी ३ एप्रिल रोजी
पात्र उमेदवारास प्रवेश पत्र ५ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत
१३ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होईल.
उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे १९ एप्रिल रोजी.
उत्तीर्ण उमेदवार मुळ कागदपत्रे छाननी २१ एप्रिल रोजी
तोंडी परीक्षा २६ एप्रिल रोजी होईल
पात्र उमेदवार निवड यादी २८ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
अशी माहिती अपर जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील नगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.