कर्जत तालुक्यात गोळीबार एकजण जखमी!!!

0
243

जामखेड न्युज——

कर्जत तालुक्यात गोळीबार एकजण जखमी

कर्जत तालुक्यातील कोरेगाव जवळील मुरकुटवाडी येथे प्रमोद विजय आतार यांच्यावर शनिवार दि. 4 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. त्यात ते जखमी झाले. यामुळे परिसरात एकघ खळबळ उडाली आहे.

याबाबत प्रमोद आतार यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली आहे. मुरकुटवाडी परिसरामध्ये त्यांच्यावर विनोद मुरकुटे व त्यांच्या इतर साथीदारांनी काही जुन्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार केला.

त्यांच्या पायामध्ये गोळी लागून ते जखमी झाले आहेत. कर्जत पोलिसांनी त्यांना तात्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना नगर येथे हलविण्यात आले आहे.

नगर येथे त्यांच्या पायामध्ये गोळी आहे की गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले आहेत याचीही तपासणी करण्यात येणार आहे.तपासणी अहवाल आल्यानंतरच याबाबत समजेल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित यांनी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान या घटनेनंतर कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here