जामखेड न्युज——
अधिकारी, कर्मचारी व लाइन स्टाफ महावितरणचे शिलेदार – योगेश कासलीवाल
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जामखेड उपविभागात राष्ट्रीय लाईनमन दिवस उत्साहात साजरा
अधिकारी कर्मचारी व लाइन स्टाफ बांधव खरे महावितरण कंपनीचे शिलेदार आहेत, त्याचा अभिमान आहे असे म्हणून जनतेला २४/७ अविरत सेवा देण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले, तसेच सेवा देत असताना सुरक्षा साधने किती आवश्यक आहेत असे महावितरणचे उपअभियंता योगेश कासलीवाल यांनी सांगितले.
आज ०४ मार्च रोजी महावितरण, जामखेड उपविभाग कार्यालय येथे राष्ट्रीय लाईनमन दिवस
मा.श्री.योगेशजी कासलीवाल, उपकार्यकारी अभियंता जामखेड उपविभाग यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.दिंगबर परदेशी (सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता) हे लाभले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन चोरगे वरिष्ठ यंत्रचालक जामखेड उपकेंद्र यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.महेंद्र कदम सहाय्यक अभियंता खर्डा कक्ष यांनी केले, प्रमुख पाहुण्याचे स्वागत श्री.हिरामन गावीत सहाय्यक अभियंता जामखेड कक्ष यांनी केले.
उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी कर्मचारी अधिकारी व लाइन स्टाफ यांच्याशी संवाद साधला व मार्गदर्शन केले,त्यांनी आपल्या भाषणात महावितरण कर्मचारी २४×७ अविरत व अखंडीत देत असलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले व महावितरण च्या नियमबद्ध व योग्य काम करणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचारी व लाइन स्टाफचे अभिनंदन केले.
सर्व लाइन स्टाफ यांना लाईनमन दिवस च्या शुभेच्छा दिल्या.
तसेच कार्यक्रमा निमित्ताने श्री.पुष्कराज मेंगाळ सहाय्यक अभियंता अरणगाव, श्री.सदाशिव थोरात लाईनमन जामखेड,श्री.किसन गोडसे लाईनमन अरणगाव, तसेच नान्नज कक्ष, अरणगाव कक्ष, खर्डा कक्ष, जामखेड कक्ष येथून जमलेल्या लाइन स्टाफ व कर्मचारी यांनी लाईनमन दिवसचे स्वागत केले, व आपले मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारच्या लाईनमन दिवस या उपक्रमाचे आभार मानले.
उपस्थित अधिकारी/कर्मचारी व लाइन स्टाफ यांना सर्वांना मिळून सुरक्षिततेची प्रतिज्ञा देण्यात आली.. तसेच गणेश केदार, सचिन जाधव, पांडुरंग ढाकणे, निलेश शिंदे, नदीम पठाण, गौरव कुलकर्णी,विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले व
कार्यक्रमाची सांगाता प्रमुख पाहुणे व अध्यक्ष व उपस्थितांचे आभार श्री.देवीदास सुपेकर मासं यांनी मानून केली.
अशा प्रकारे आज ०४ मार्च २०२३ राष्ट्रीय लाईनमन दिवस महावितरण जामखेड उपविभाग येथे उत्साहात साजरा करण्यात आला.