जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत जवळपास सव्वापाच हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत हा सर्व खर्च आरोळे कोविड सेंटर करते त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आहे परिसरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील शिवसैनिकांनी आरोळे कोविड सेंटरला अन्नधान्य व भाजीपाल्याची मदत केली. 

हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी सहसंपर्क प्रमुख डॉ विजय पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या सुचनेनुसार शिवसेना हा पक्ष ८० % समाजकारण व २० % राजकारण करणारा पक्ष आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कोणाला मदतीची गरज असेल अशा ठिकाणी शिवसेना धावून जाते जामखेड परिसरातील सुमारे सव्वा पाच हजार कोरोना रूग्ण मोफत बरे करणारे आरोळे कोविड सेंटरला मदतीची गरज आहे हे ओळखून जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांनी तालुक्यातील शिवसैनिकांना मदतीचे आवाहन केले त्यानुसार आज आरोळे कोविड सेंटरला अन्नधान्य व भाजीपाल्याची मदत करण्यात आली.

आज हि मदत शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना शहर उपप्रमुख अवि (दादा) बेलेकर, प्रीती एजन्सी किरण काका उदारे, सुखदेव बोराटे,जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गुंदेचा, कैलास (आबा) खेत्रे, विठ्ठल गायकवाड, दिपक सुरसे, विशाल निमोणकर यांनी ही मदत आरोळे कोविड सेंटरच्या सुलताना भाभी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी शिवसैनिकांचे आरोळे कोविड सेंटरच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच आरोळे कोविड सेंटरला जी काही मदत हवी असेल ती शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन शिवसैनिकांनी दिले.
