जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
तालुक्यातील खर्डा येथील गोपाळघरे परिवाराने परंपरेनुसार रक्षा नदी पत्रातून विसर्जन न करता त्यांनी घराजवळील शेतामध्ये वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचे संकल्प करण्यात आले. अस्थीविसर्जन नदीपात्रात किंवा इतर जलाशयामध्ये न करता वृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्यात रक्षा विसर्जित करून वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे गोपाळघरे कुटुंबीयांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
फोटो

सध्या कोरोना या महामारी आजारामुळे जिल्हा बंदी असल्याकारणाने राख (रक्षा) तिर्थस्थळी, नदी मध्ये टाकुन नदीचे प्रदूर्शन होते. ते ही थांबेल व आज कोरोना रुग्नांना ऑक्सीजन ची आवश्यकता व त्याचे महत्व कळू लागले. या नातवांनी आपल्या आजोबांची कायम आठवण राहावी म्हणुन घरासमोरील शेतामध्ये मोठे खड्डे करून राख टाकुन वृक्ष लागवड करण्यात आले. नानासाहेब गणपती गोपाळघरे यांचे वयाच्या 90 वर्षी नुकतेच वृद्धापकलाने निधन झाले.
Advertisement

त्यांचे अस्थिविसर्जन नदी किंवा तीर्थस्थळी जाऊन न करण्याचे निर्णय त्यांच्या नातू रामदास गोपाळघरे, तुळशीदास गोपाळघरे, डॉ. वैष्णवी केदार, दीपाली केदार,अंगद गोपाळघरे, अमित गोपाळघरे , विकास गोपाळघरे, प्रकाश गोपाळघरे, किरण गोपाळघरे, पणतू तेजस गोपाळघरे , पंकजा गोपाळघरे यांनी घेतला.
Advertisement

आमचे आजोबा वटवृक्ष – गोपाळघरे
आमचे आजोबा आमच्या कुटुंबासाठी व नातेवाईकांसाठी वटवृक्षासारखा आधार वाटत होते. त्या रोपट्यांच जतन करून त्यांचा वटवृक्ष करून झाडांची सावली व फळे इतरांसाठी उपयोगी पडतात तसेच आजोबांनी चांगल्या विचारांची दिलेली शिकवण व त्यांचे संस्कार समाजासाठी कामी येतील.
– तुळशीदास गोपाळघरे , खर्डा नातू