शिंदे -फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार – खासदार सुजय विखे पाटील जल जीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेचे खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

0
149

जामखेड न्युज——

शिंदे -फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार – खासदार सुजय विखे पाटील

जल जीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेचे खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा शब्द दिला त्याच शब्दाची वचनपूर्ती सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगताना मागील तीन वर्षांत आपल्या राज्यात आघाडीचे सरकार असल्याने आपल्याकडे या योजनेंतर्गत काम होऊ शकले नाही, मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या तीन महिन्यांत जलजीवन मिशनचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आणि नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ देखील सुरू झाला असे सांगितले. आपले सरकार असल्यावर हा फायदा होतो असे प्रतिपादन खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले.

जामखेड तालुक्यातील अरणगांव, पिंपरखेड, जामखेडमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा तसेच जामखेड- सौताडा राष्ट्रीय महामार्ग ५४८डी च्या कामांचा शुभारंभ तसेच तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेचे वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी अहमदनगर दक्षिणचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डाॅ सुजय विखे बोलत होते.

यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, भाजप तालुका अध्यक्ष अजय काशीद, बापुराव ढवळे, मनीषा मोहोळकर ,डॉ झेंडे ,सरपंच राजेंद्र ओमासे, माजी उपसभापती अंकुशराव ढवळे, रविंद्र सुरवसे, सोमनाथ पाचरणे, सरपंच अंकुश शिंदे, पांडुरंग उबाळे, डाॅ भगवान मुरुमकर, शरद कार्ले ,लहू शिंदे, उपसरपंच अविनाश गायकवाड, करण ढवळे, बिभीषण धनवडे, प्रविणशेठ चोरडिया, गौत्तम उत्तेकर, अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पोकळे, पोपट राळेभात, उध्दव हुलगुंडे, अशोक महारनवर, ॲड प्रविण सानप, वैजीनाथ पाटील, बाजीराव गोपाळघरे यांच्या सह सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना विखे म्हणाले की,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ओव्हरलोड डीपी बदलून देऊ अशी आपणास मी ग्वाही देतो. केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार आहेत तसेच कर्जत जामखेड मतदारसंघात देखील डब्बल इंजिन सरकार आहे.. मतदारसघांतील प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे.तसेच मतदरसंघांतील सर्व घटकांना न्याय देऊ असा विश्वास डॉ सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी मंत्री प्रा. आमदार राम शिंदे यांनी आपले विचार व्यक्त करून शिंदे फडणवीस सरकार किती फायद्याचे आहे हे सांगितले. पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी यांना विराजमान करावे असे आवाहन त्यांनी केले.

  1. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या कार्यक्रमात खा. विखे म्हणाले की, गोरगरीब जनतेचा सातत्याने केवळ विचार नाही तर त्याकरिता चांगली योजना आखून ती लाभार्थां पर्यंत पोहचविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र काम करत असतात, एवढेच नाहीतर ज्या जेष्ठ नागरिकांना त्यांची मुले विचारात नाही अशा जेष्ठ नागरिकांचा ही मोदींनी विचार करून त्यांच्यासाठी देखील राष्ट्रीय वयोश्री ही योजना कार्यान्वित केली, आणी ती यशस्वीपणाने राबवली. या योजनेतून अहमदनगर जिल्ह्यास 42 कोटी रूपयांचा निधी आला आणि जिल्ह्य़ातील हजारो जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता आला, वीस हजार रूपयांचे जेष्ठ नागरिकांचे साहित्य एका एका जेष्ठ नागरिकास यास या योजनेच्या माध्यमातून मिळाले आहे असे सांगून ते म्हणाले की सर्व समावेशक आणि सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन मागील आठ वर्षांपासून मोदी हे काम करत आहेत . अशा नेत्याला आपण ही पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान करावे असे आवाहन यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here