जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयाच्या शुभम हंबीरावला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक
राष्ट्रीय स्तरावर जामखेड महाविद्यालयातील खेळाडूं शुभम अरुण हंबीरराव यांची चमकदार कामगिरी
पंजाब येथे सुरु असलेल्या SSPF National Games 2022-23 या मध्ये जामखेड महाविद्यालय जामखेड चा खेळाडूं शुभम हंबीराव यांने 800 मीटर या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकवल्याबद्दल मनस्वी अभिनंदन करण्यात आले आहे.
शुभम हंबीराव यांच्या यशामुळे जामखेड महाविद्यालय जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या विद्यार्थ्यांना वेळोवेळी NCC विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. केळकर आणि जिमखाना प्रमुख डॉ. आण्णा मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
यायशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, उप-प्राचार्य डॉ. सुनिल नरके तसेच सर्व संचालक मंडळ व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पदक विजेते खेळाडूंचे अभिनंदन केले.