जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक 10-2-2023 रोजी सन 2019-2020 व 2020-2021 या वर्षातील इयत्ता दहावी,बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेडचे संचालक श्री सैफुल्ला खान साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे श्री अशोकशेठ शिंगवी साहेब हे होते. त्यावेळी प्राचार्य
श्री श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ,उपप्राचार्य श्री पोपटजरे,पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले. दोन वर्षातील इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी व त्यांनी उंचावलेले शाळेचे नाव त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.त्याचबरोबर त्या दोन वर्षाच्या काळातील एकूण निकाल व प्रगती याबद्दल प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,ट्रॉफी,रोख स्वरूपात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री सैफुल्ला खान साहेब व प्रमुख पाहुणे आदरणीय श्री अशोकशेठ शिंगवी साहेब, माजी प्राचार्य श्री अनंता खेत्रे व मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री सैफुल्ला खान साहेब यांनीही आपल्या मनोगता मध्ये विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व त्याचबरोबर पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री अशोक शेठ शिंगवी यांनी विद्यार्थ्यांनी खडतर परिश्रम घेऊन प्रामाणिकपणा अभ्यासातील सातत्य ठेवून विद्यालयाचे व जामखेड चे नाव उंच करावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. त्याचबरोबर आपण काम करत असताना सामाजिक भान ठेवून समाजासाठी ही आपण कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक श्री रमेश आडसूळ साहेब यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण गायकवाडसर व प्राध्यापक श्री विश्वनाथ आघाव सर यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी श्री रोहित घोडेस्वार व समारंभ प्रमुख श्री नरेंद्र डहाळे व अध्यापक/प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.