शिवजयंती निमित्त भक्ती शक्तीचा अनोखा सोहळा आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून जगदगुरु तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित आज ऐतिहासिक महानाट्य

0
185

जामखेड न्युज——-

शिवजयंती निमित्त भक्ती शक्तीचा अनोखा सोहळा

आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून जगदगुरु तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित आज ऐतिहासिक महानाट्य

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आज दि. १३ फेब्रुवारी रोजी जामखेड शहरातील ल. ना. होशिंग विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे ऐतिहासिक महानाट्य पाहण्याची संधी जामखेडकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महानाट्याचे साक्षीदार व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

आमदार रोहित पवार हे आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघात विकास कामाबरोबरच नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आसतात. याच आनुशंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथिल ल. ना. होशिंग विद्यालयाल या ठीकाणी दि १३ फेब्रुवारी सायंकाळी ६: ०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या महानाट्यात भक्ती शक्तीचा आनंद सोहळा पहाण्याचा एक आगळा वेगळा क्षण जामखेड करांना पहावयास मिळणार आहे. या नाटकाचे लेखक बाबाजी राणे तर दिग्दर्शक संतोष पवार यांनी केले आसुन निर्मिती ज्ञानेश्वर महाराव यांनी केली आहे. विषेश म्हणजे देखण्या टीव्ही स्टार कलाकारांसह ज्ञानेश महाराव आणि साक्षात तुकोबा प्रतिबालगंधर्व विक्रांत आजगावकर हे या महानाट्यात पहावयास मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here