जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला परिसरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश (दादा) आजबे यांनी केले होते. कोविड सेंटरला सध्या मदतीची आवश्यकता असून पाच हजारांपेक्षा पेक्षा जास्त रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तेही पुर्णपणे मोफत त्यामुळे सध्या आरोळे कोविड सेंटरला मदतीची गरज आहे.
आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर धान्य, किराणा व भाजीपाला गोळा करून आरोळे कोविड सेंटरला मदत केली आहे तसेच परिसरातील दानशूर व्यक्तींनी मोफत उपचार करणार्या आरोळे कोविड सेंटरला मदत करावी असे आवाहन मंगेशदादा आजबे यांनी केले होते त्याला प्रतिसाद देत आज मातोश्री कन्ट्रक्शनचे मालक अभिमन्यू पवार यांनी आरोळे कोविड सेंटरला रोख पंधरा हजार रूपयांची मदत देत सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक दातृत्व दाखविले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येकांनी आपल्या घासातील घास देऊन लोक सहभागातून सुरू असलेल्या आरोळे कोविड सेंटरला मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे, उमेश माळवदकर, ओंकार पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.