जामखेड न्युज——
हंडामुक्त होणारा कर्जत जामखेड हा देशातील पहिला मतदारसंघ – आमदार रोहित पवार
जलजीवन मिशनमध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा मुक्त होणारा देशातील पहिला मतदारसंघ म्हणून कर्जत जामखेडचा क्रमांक लागतो. आज प्रत्येकाच्या घरात नळाचे पाणी येत आहे. याचबरोबर रस्ते, वीज, पर्यटन, आरोग्य असे जनतेला अपेक्षित असणारे विकासाचे कामे मार्गी लागत आहे.
पत्रकार दिनानिमित्त आज जामखेड मधील पत्रकारांचा कुटुंबांसमवेत आमदार रोहित पवार यांनी सन्मान आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष फायकअली सय्यद, तालुकाध्यक्ष
दिपक देवमाने, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत, वसंत सानप, अशोक निमोणकर, मिठाला नवलाखा, स्तरामध्ये सुळ,अशोक वीर, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद, किरण रेडे, संतोष गर्जे, दत्तराज पवार, मोहिद्दिन तांबोळी, किशोर दुशी, प्रकाश खंडागळे, संजय वारभोग, श्वेता गायकवाड, संदेश हजारे, लियाकत शेख, धनराज पवार, शिवाजी इकडे, किरण पाटील, बाळासाहेब वराट, नंदुसिंग परदेशी, समीर शेख, सैफाली सय्यद, राजू भोगिल, सचिन आटकरे, अनिल धोत्रे, रामहरी रोडे, बाळासाहेब शिंदे, सुजीत धनवे, तुळशीदास गोपाळघरे, शंकर कुचेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, चांगल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले तर त्याचे विपरीत परिणाम होतात सध्या मतदारसंघात हे सुरू आहे. कर्जत जामखेडचे नावलौकिक देशात झाले पाहिजे यादृष्टीने आपले काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पाणंद रस्ते केले, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य या सुविधा कशा निर्माण होतील हे पाहिले. खर्डा, मिरजगाव पोलीस स्टेशन केले. मिरजगाव येथे ट्रामा केअर सेंटर तर जामखेड येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त उपजिल्हा रूग्णालय होत आहे तसेच कुसडगाव येथे एसआरपी ट्रेनिंग सेंटर होत आहे. सर्वात मोठा भगवा ध्वज खर्डा येथे फडकत आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, माझी बातमी नाही लावली तरी चालेल पत्रकारांनी मतदारसंघातील जनतेला न्याय द्यावा त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय द्यावा असे आवाहन केले जामखेड मधील पत्रकार स्वाभिमानी आहेत ते लोकप्रतिनिधींचा दबाव स्विकारत नाहीत. स्वाभिमानाची धार जामखेड मधील पत्रकारितेला आहे. तसेच सर्वाच्या सहकार्याने कर्जत जामखेडच्या विकासाचा गाडा चालवत आहे.