जामखेड न्युज——
युवराज आजबे या तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या जामखेड परिसरात एकच खळबळ
जामखेड नगरपरिषद हद्दीत असलेल्या जमादारवाडी येथील युवराज बाळासाहेब आजबे या अविवाहित तरूणाने राहत्या घरातील अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड नगरपरिषद हद्दीतील जमदारवाडी येथील रिक्षा चालक विठ्ठल बाळासाहेब आजबे यांना त्यांच्या पत्नीने फोनवर दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल आजबे हे घरी गेले असता आपला भाऊ युवराज याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
यावरून त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. जामखेड पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ते सोपस्कार पार पाडले तसेच मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
ही घटना या घटनेतील खबर देणार मयत युवराज याचे भाऊ विठ्ठल बाळासाहेब आजबे यांचे जमादारवाडी येथील राहते घरात दि. ९ फेब्रुवारी रोजी ६: ३० वाजताचे पुर्वी घडली आहे.
या बाबत जामखेड पोलीसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे करत आहेत.