जामखेड न्युज——
भरदिवसा नाहुलीत घरफोडी सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास
सध्या शेतात सुगीचे काम असल्यामुळे गावात तुरळक लोक असतात बहुतेक लोक शेतात कामाधंद्यासाठी जातात याच संधीचा फायदा चोरटे उचलतात व दिवसा घरफोड्या करतात दिवसा चोरीच्या घटनेने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेश संजय बहीर वय 26 यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सुरेश बाहिर वडील संजय बहिर,आई रंजनाबाई,पत्नी चैताली, मुलगा स्वराज व मुलगी स्वराली भाऊ विठ्ठल अशी एकत्र शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
दिनांक आठ फेब्रुवारी 2022 रोजी मी सकाळी माझ्या वैयक्तिक कामासाठी अहमदनगरला गेलो होतो, माझ्या घरातील सर्वजण घराला कुलूप लावून ब्रह्मणाथ वस्ती नाहुली तालुका जामखेड दुपारच्या सुमारास शेतात ज्वारीची काढणी करण्या करीता गेले होते. शेतात काम करीत असताना माझे चुलत भाऊ लहू बहिर रा.नाहुली याने फोन करून सांगितले की, तुमच्या दोन्ही घराचे दरवाजे उघडे असून तुमच्या घरी चोरी झाल्याचे सांगितले त्यानंतर मी संध्याकाळी सहा वाजता नाहूली येथील घरी आलो असता मला दोन्ही घराचे कडी कोयंडा तुटलेला दिसला घरातील लोखंडी व लाकडी कपाटाची उचकापाचक करून कपाटा तील ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत.
त्यानंतर मला खात्री झाली की अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेले आहेत. यामध्ये 12.5 ग्रॅम वजनाचे 25 हजार रुपयांचे सोन्याची चैन, दहा ग्रॅम सोन्याचे 20 हजार रुपये किमतीचे गंठण,दहा ग्रॅम वजनाच्या वीस हजार रुपये किमतीचे सोन्याची नेकलेस, दीड ग्रॅम वजनाचे तीन हजार रुपयांचे लहान मुलाच्या सोन्याचे ओम असा एकूण 70 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत अशी फिर्याद खर्डा पोलीस स्टेशनला दिली देण्यात आली आहे.
खर्डा भागात सध्या ज्वारी काढण्याचे काम जोरात सुरू आहे,सर्व शेतकरी बांधव घरातील सर्वांना सोबत घेऊन शेतात कामे करू लागली आहेत त्यामुळे गावच्या गावे दुपारी ओस पडत असल्याने अज्ञात चोरटे या संधीचा फायदा घेऊन दिवसाच घरफोड्या करू लागले आहेत. याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे हे करीत आहेत.