जामखेड न्युज——
पुणे पोलिसांना चकवा देणारा आरोपी जामखेड पोलिसांनी केला जेरबंद!!!
तीन दिवसात दुसऱ्या फरार आरोपीला जामखेड पोलीसांनी ठोकल्या बेड्या
दोन दिवसांपूर्वी विसापूर जेलमधून एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस जामखेड पोलीसांनी जेरबंद करत कारागृह प्रशासनाच्या ताब्यात दिले तर आज पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरार आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत त्यामुळे तीन दिवसात दोन आरोपींना पकडण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे यामुळे जामखेड पोलिसांचे कौतुक केलं जात आहे.
फरार आरोपी
गेल्या अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड, पुणे येथील अनेक गुन्ह्यात पोलीसांना चकवा देत फरार असलेला आरोपी सावळा शिवाजी खाडे, रा. पाटोदा (ग), ता. जामखेड, जि. अहमदनगर हा जामखेड मध्ये येत असल्याची माहीती पोना / अजित कुटे, अंमली पदार्थ विरोधी पथक, पुणे यांना मिळाल्याने त्यांनी सदर बाबत त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीष पवार (अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड, पुणे) यांना कळविले.
त्यांनंतर सदर माहीती संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक जामखेड यांना दिल्याने लगेच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोसई. संपत कन्हेरे व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर आरोपी नामे सावळा शिवाजी खाडे, याची माहीती देवुन त्याबाबत अधिक माहीती मिळवून त्याला तात्काळ अटक करणेबाबत आदेश दिले
सदरचे पथकाने सावळा शिवाजी खाडे, याच्या बाबत माहीती मिळाली असता पो.नि. संभाजी गायकवाड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. आरोपी हा दि- 06/02/2023 रोजी त्याची गावी येणार आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोनि. गायकवाड साहेब यांनी सदर माहीती अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड येथे कळवून त्यांना जामखेड पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले.
यावेळी पोनि. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोसई, संपत कन्हेरे, पो.कॉ.अरुण पवार, पो.कॉ संदिप राऊत, पो.कॉ संदिप आजबे, विजय कोळी, हनुमान आरसुळ व अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड, पुणे येथील सुर्यवंशी, पोहेकॉ. बनसोडे, पोना. कुटे व पोना धस यांनी आरोपी याचा त्याचे गावात शोध घेत असताना आरोपी हा त्याच्या घराचे छतावरील पत्र्यावर लपुन बसला असल्याचे समजले त्यांनतर लगेच तेथे सदर पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शिताफीने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड येथील पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे.
पुढील तपास सपोनि. प्रशांत महाले नेमणुक अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड हे
करत आहेत. आरोपी सावळा शिवाजी खाडे, रा. पाटोदा गरड याचे एन.डी.पी.एस कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोनि. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोसई संपत कन्हेरे, पोकॉ. अरुण पवार, संदिप राऊत, संदिप आजबे, विजय कोळी, पोहेकॉ. हनुमान आरसुळ यांचे पथकाने केलेली असुन सदर पथकाचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे कडुन अभिनंदन करण्यात आले आहे.तसेच जामखेड मधील जनतेने जामखेड पोलिसांचे अभिनंदन केले आहे.