जामखेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रा. अरूण वराट मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

0
209

जामखेड न्युज——

जामखेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रा. अरूण वराट मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक सहकार महर्षी स्व.जगन्नाथ तात्या राळेभात यांच्यावर प्रेम करणाऱ्या सहकारातील सर्व चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच खरेदी विक्री संघाला प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारांनी ही निवडणूक बिनविरोध केली. जामखेड तालुक्यातील खरेदी विक्री संघाचे स्थान हे महत्वाचे आहे.तालुक्यातील सर्व सेवा संस्थांचे प्रतिनिधी हे खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी संस्था आहेत. निवड बिनविरोध झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जामखेड तालुका खरीदी विक्री संघाच्या संचालकपदी माजी सभापती सुधीर राळेभात पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल साकत सेवा सोसायटीच्या वतीने माजी चेअरमन व खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे स्वियसहायक प्रा. अरुण वराट यांनी जिल्हा सहकारी बँकेत जाऊन सत्कार केला

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, हाळगावचे चेरमन किसनराव ढवळे, माजी सरपंच भारत काकडे पाटील, चेअरमन आशोक महारनवर, सचिव दत्तात्रय चौरे, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 


नवनिर्वाचित संचालक मंडळ–

उगले संजय बापूराव,
सावंत जयवंता दत्तात्रय,
राळेभात मंदाकिनी जगन्नाथ,
राळेभात सुधीर जगन्नाथ,
थोरात दादाहारी नरहरी,
रेडे रावसाहेब एकनाथ,
पवार अविनाश नामदेव,
सपकाळ नितीन रामदास,
कडभने साहेबराव धोंडीराम,
काळदाते सुभाष श्रीपती,
शिंदे अनिता गजानन,
घुमरे दीपिका अशोक,
सुतार सुमित कैलास,
फुंदे भास्कर विठ्ठल,
घायतडक विक्रांत त्रिभुवन
यांचा समावेश आहे.

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री. अमोल जगन्नाथ राळेभात व मार्केट कमेटीचे माजी सभापती सुधीर (दादा)राळेभात यांनी नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाचा सत्कार केला आणि संघ बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आणि भविष्यात हे संचालक मंडळ आणखी चांगले काम करून खरेदी विक्री संघाच्या वैभवात भर घालतील असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here