जामखेड न्युज——
८५० कोटीच्या करमाळा जामखेड पाटोदा रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू
आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसाहाय्य मिळणार
राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची क्लाँलिटी
मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याच्या
उद्देशातून करमाळा- जामखेड पाटोदा हा राज्यमार्ग आशियाई डेव्हलपमेंट अर्थसाह्यातून राष्ट्रीय बँकेच्या
महामार्गाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२३ अखेर निविदाप्रक्रिया पूर्ण करून २०२४ मध्ये या महामार्गाच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ होईल अशी शक्यता आहे. करमाळा, जामखेड आणि पाटोदा या तीन शहरांना जोडणारा हा महामार्ग एकूण ६० किलोमीटर लांबीचा आहे. सर्वेक्षण अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर कामास सुरुवात होईल.
या महामार्गामुळे जवळा- नान्नज- जामखेड- साकत पाटोद्यासह अन्य १८ लहान-मोठी गावे महामार्गावर येणार आहेत. यासाठी ८५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे हा महामार्ग महाराष्ट्र सरकार आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाह्यातून करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा महामार्ग करण्यात येणार आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर होणार असला तरी रस्त्याचा मूळ दर्जा राज्यमार्ग ५६ हाच राहणार आहे. एक किलोमीटर रस्त्यासाठी साधारण पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
करमाळा जामखेड पाटोदा रस्त्याचे वैशिष्ट्ये
दहा मीटर रुंद क्राँक्रीट रस्ता,
करमाळा, पोथरे, जवळा, नान्नज, झिक्री, जामखेड, साकत, पाटोदा या गावानजीक १५ मीटर रूंदी चौपदरी रस्ता होणार
डिव्हायडर दुतर्फा सात मीटरचा काँक्रीटचा दुतर्फा रेलिंग दोन्ही बाजूंना बंदिस्त काँक्रीट गटार आणी पथदिवे असतील
अँप्रोच रस्ते ५० मीटर लांबीपर्यंत काँक्रीटचे होणार
-
या जिल्ह्यात एवढ्या किलोमीटरचा रस्ता
सोलापूर जिल्ह्यात १४ किलोमीटर
नगर जिल्ह्यात ४० किलोमीटर
बीड जिल्ह्यात ६ किलोमीटर
तीन विभाग, तीन जिल्हे, तीन मोठी शहरे, जोडणार
करमाळा जामखेड पाटोदा या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे.
सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण अहवाल शासनास सादर करण्यात येईल यानंतर मंजुरी मिळाली तर
वर्षाअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण होवून पुढील वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. अशी शक्यता आहे.
श्रीनिवास लखापती- शाखा अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग