गोळाफेक मध्ये उपेश धनलगडे राज्यात दुसरा क्रमांक राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
227

जामखेड न्युज——

गोळाफेक मध्ये उपेश धनलगडे राज्यात दुसरा क्रमांक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड, जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत उपेश धनलगडे गोळाफेक राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. याने 17 वर्षे वयोगटात गोळा फेक या क्रीडा प्रकारात राज्यात दुसरा क्रमांक पटकावत सिल्व्हर मेडल मिळविले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


गोळा फेक या क्रीडा प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांक
पटकविल्याने त्यास सिल्वर मेडल मिळाले आहे. त्यामुळे ल. ना. होशिंग विद्यालयाचे तसेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 
त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.


उपेशचे वडिल राघवेंद्र धनलगडे हे क्रीडा शिक्षक आहेत. त्यांनी लहानपणापासून गोळाफेक याचे शिक्षण दिले आहे त्यामुळे चार वेळा तो गोळा फेक मध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकलेला आहे. उपेशने गोळाफेकमध्ये यश मिळवल्याने शाळेचे शिक्षकांचे व तालुक्याचे नाव मोठे केले आहे.

 

दि.29 ते 31 जानेवारी 2023 पुणे बालेवाडी येथे चालु असलेल्या राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेत ल.ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील चि.उपेश धनलगडे याने 17 वर्षे वयोगटात गोळा फेक या क्रीडा प्रकारात राज्यात दुसरा क्रमांक सिल्व्हर मेडल मिळविले आहे पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

तसेच चि.ऋषीकेश धनलगडे 17 वर्षे वयोगटात थाळी फेक या क्रीडा प्रकारात राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे.

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष उद्धवरावजी देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठजी चिंतामणी, सेक्रेटरी शशिकांत देशमुख, सहसेक्रेटरी दिलीपजी गुगळे, खजिनदा राजेश मोरे व सर्व संचालक मंडळ यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडा अध्यापक प्रल्हाद साळुंके राघवेंद्र धनलगडे, धिरज पाटील, बापुराव जरे तसेच विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करणारे विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक रमेश अडसुळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here