जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. सर्व खर्च आरोळे हॉस्पिटलने केलेला आहे त्यामुळे सध्या ते आर्थिक अडचणीत आहेत. परिसरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार जामखेड तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेतर्फे आरोळे कोविड सेंटरला एक्कावन्न हजार रुपयांची मदत केली आहे त्यांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मोफत उपचार करणार्या आरोळे कोविड सेंटरला समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार जामखेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयांची मदत आरोळे कोविड सेंटरच्या संचालिका डॉ. शोभा अरोळे यांच्या कडे देण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, ग्रामसेवक राजेंद्र वळेकर, प्रशांत सातपुते, सचिन गदादे, रफिक तांबोळी, निलेश टेकाळे, यांच्या हस्ते देण्यात आली.
ग्रामसेवकांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल डॉ. शोभाताई आरोळे यांनी ग्रामसेवकांचे आभार मानले.