जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्याला रेमडेसीवीर इंजेक्शन द्यावेत अन्यथा २८ एप्रिल पासून तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा राज्य सह-सन्मवयक अदिवासी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य अॅड डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या जामखेड तालुक्यात कोरोना महामारीने हाहाकार माजला आहे, सर्वसामान्य जनता रेमडेसीवीर इंजेक्शन साठी वणवण भटकत आहे. आज जामखेड तालुक्यात काळयाबाजाराने रेमडेसीवीर
इंजेक्शनचा दर २५ ते ३० हजार रूपये आहे. जामखेड मध्ये काळयाबाजाराने इंजेक्शन कसे मिळते? हा पुरवठा मा. जिल्हाधिकारी यांनी कोणाकडे दिला आहे?
काही राजकीय पदाधिकारी व प्रशासन यांनी संगनमताने तर हा काळाबाजार सुरू केला नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गोरगरिबांना काळयाबाजाराने इंजेक्शन विकतं घेऊन रुग्णांना देण्याची ऐपत नाही. तरी
मा.जिल्हाधीकारी यांनी हा पुरवठा कोणाकडे दिला आहे हे जाहीर करूनं काळाबाजार थांबवावा व काळा बाजार करणाराचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करावी व रेनडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा सर्वसामान्य जनतेसाठी योग्य दरात करून द्यावा अन्यथा दि. २८ एप्रिल पासून तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा अॅड अरूण जाधव यांनी दिला आहे.
निवेदनाची प्रत आरोग्यमंत्री, पालकमंत्री नगर, अॅड प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी नगर, मा. खासदार सुजय विखे-पाटील, आमदार रोहित पवार, प्रांताधिकारी कर्जत-जामखेड, तहसीलदार जामखेड यांना दिली आहे.