जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे झालेले आहेत. हेच रूग्ण जर खाजगी हॉस्पिटलमधे असते तर प्रत्येकाचे बील एक लाख ते दोन लाखांच्या आसपास झाले असते तेव्हा पाच पैसेही खर्च न होता बरे झालेल्या रूग्णांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पंधरा हजार रुपये तरी आरोळे कोविड सेंटरला द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना संसर्गामुळे हैराण आहोत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. खाजगी हॉस्पिटलमधे एका एका पेशन्टचे बील एक लाख ते पाच लाखांच्या आसपास झालेले आहे. पण औषधोपचारासह नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय आरोळे कोविड सेंटर मध्ये होत आहे दररोज मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे तेव्हा परिसरातील दानशूर व्यक्ती मदत करत आहेत. मोफत उपचार घेणाऱ्यांनी बरे होऊन घरी जाताना कमीत कमी पंधरा हजार रुपये द्यावेत म्हणजे आरोळे हॉस्पिटलची सेवा अविरत सुरू राहील असे आवाहन रमेश आजबे यांनी केले आहे.
आपल्या जामखेड तालुक्याला तसेच परिसरातील शेजारच्या आष्टी, पाटोदा, भूम, परांडा, करमाळा तालुक्यासाठी वरदान असलेले आरोळे हॉस्पिटल कोणतीही सरकारी मदत न घेता सामाजिक कार्य व सेवा देत आहेत त्यामध्ये कोरोना रुग्णांची सेवा, त्यांचे औषध, त्यांना नाष्टा दोन वेळच्या जेवणापर्यंत सर्व सोय आरोळे हॉस्पिटल येथे केली जात आहे. आणि तीही निशुल्क तेथील कर्मचारी वर्ग रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत आहेत, हजारो रुग्ण कोरना मुक्त होऊन तिथून गेले आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून कोरना मुक्त झालेल्या रुग्णांना सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा) यांनी असे आवाहन केले आहे की, आपण बरे होऊन घरी जात असताना आपल्या आरोळे हॉस्पिटल साठी मदत करावी कमीत कमी १५ हजार रुपये आपण हॉस्पिटलला मदत म्हणून देऊ शकता कारण हा सर्व खर्च आरोळे हॉस्पिटल करत आहे तर ऑक्सिजनचा खर्च आपले लाडके आमदार रोहित दादा पवार, हे करत आहेत. जर आपण एखाद्या खाजगी रुग्णालयात गेलो तर त्याचे बिल कमीत कमी दोन तीन लाख होऊ शकते, पण देवदूत बनून आरोळे बहिण भावाने जामखेडकरांची सेवा केली आहे. पुन्हा एकदा मी कळकळीचे आव्हान करतो की, बरे झालेल्या रुग्णांनी घरी जाते समयी कमीत कमी 15 हजार रुपयांची मदत करावी अशी नम्र विनंती सामाजिक कार्यकर्ते रमेश( दादा) आजबे यांनी केली आहे.