जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सामाजिक भावनेतून ५० आँक्सीजन सिलेंडर तसेच धान्य व किराणा – भाजीपाला या स्वरूपात मदत केली आहे.
जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प अंतर्गत चालणारे रुग्णालय जे कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करणारे महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे. आज पर्यंत 5000 (पाच हजार) पेक्षाही जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आलेले आहेत. तेही अगदी मोफत त्यामुळे या कोविड सेंटरला मदतीची गरज आहे. तेव्हा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी एकत्र येत मदत केली आहे तेव्हा कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे यांनी शिक्षकांचे आभार मानले व अशाच प्रकारे परिसरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे.

यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रा.लक्ष्मण ढेपे, आण्णासाहेब सावंत, बापुसाहेब गायकवाड, जेष्ठ मार्गदर्शक उत्तम पवार, समिती अध्यक्ष विजयकुमार जाधव, जितेंद्र आढाव, प्रताप पवार, अशोक घोडेस्वार, पोपट तुपसौंदर, सुशील पौळ, संजय घोडके, दत्ता ऊदारे, दत्ता भोसले, प्रदिप कांबळे, सुरेश मोहीते, जालिंदर यादव, किशोर राठोड, गणेश देवकते, ज्ञानू राठोड, राजेश्वर पवार, राहुल चव्हाण, पांडूळे सर, पुलावळे सर, गोटमवाड सर, कौले सर, जटाडे सर, अझर सर, सवाई सर, विठ्ठल पवार, शिंदे सर, गोरड सर, साठे सर, भिसे सर, तुपविहीरे, महारनवर, चव्हाण सर, शिल्पा साखरे ,माने मॕडम, आलमले मॕडम,जायभाय मॕडम, पाडळे मॕडम, कौले मॕडम, आरडक मॕडम, फलके मॕडम, काळे मॕडम, आदी शिक्षक बांधव/भगिणी उपस्थित होते.