शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी तालुक्यात नवीन राजकीय समिकरण उदयास येणार?

0
265

जामखेड न्युज——

शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

तालुक्यात नवीन राजकीय समिकरण उदयास येणार?

बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान. त्यांचा आज 97 वा जन्मदिवस. त्यामुळे यांना अभिवादन करण्यासाठी जामखेड शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यामुळे तालुक्यात लवकरच नवीन राजकीय समिकरण उदयास येणार अशी चर्चा रंगली आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. डॉ. अरूण जाधव, मोहन जाधव, शहर प्रमुख गणेश काळे, जेष्ठ शिवसैनिक महादेव आरेकर, रंगनाथ राजगुरु, शिवाजी केवडे, बाळासाहेब आरेकर,शहर उपप्रमुख चंदन अंधारे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, कैलास खेत्रे, पप्पू काशिद, सागर गुंदेचा, अंगद चव्हाण, दिपक सुरसे, राजगुरु सर, नितीन खेत्रे, पै. अशोक आजबे, उत्तम पवार, विशाल अब्दुले, विशाल सोनार, बंडू काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना ठाकरेगट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वर्गीय हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. आणी पुढील राजकीय समिकरणाची नांदी यानिमित्ताने दिसून आली. राज्यात लवकरच शिवसेना व वंचित बहुजन आघाडी युती होणार अशी चिन्हे आहेत यानुसार तालुक्यातही शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.

स्वर्गीय हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण यानुसार शिवसेनेचे काम सुरू आहे यानुसार जामखेड शिवसेनेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here