महसुल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत खाजगी कामासाठी वापरणाऱ्या पस्तीस ठिकाणांहून पन्नास आॅक्सिजन सिलेंडर जप्त

0
197
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट.) 
   कोरोना महामारी मुळेऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता काही खाजगी लोक वेल्डिंग व इतर कामांसाठी आॅक्सिजन वापरतात हि बातमी मिळताच महसुल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पस्तीस ठिकाणांहून पन्नास आॅक्सिजन सिलेंडर जप्त केले आहेत यातील दहा सिलेंडर पुर्ण क्षमतेने भरलेले मिळाले याचा वापर आरोळे कोविड सेंटर मधील आॅक्सिजनची गरज असणार्‍या रूग्णांसाठी होणार आहे. या कारवाई बद्दल महसुल प्रशासन व पोलीस प्रशासनाचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.
       सध्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. अनेक रूग्णांना आॅक्सिजनची नितांत गरज असते. सर्वच हाॅस्पिटलमध्ये आॅक्सिजनचा तुटवडा जाणू लागलेला आहे यातच कोविड सेंटरला आॅक्सिजन पुरवठा करणारे काही पुरवठा दार जादा किंमत घेऊन खाजगी व्यक्तींना आॅक्सिजन सिलेंडर पुरवतात ते खाजगी व्यक्ती वेल्डिंग, ट्रेलर, ट्रॉली यासाठी वापरतात. इकडे मात्र कोविड सेंटरला आॅक्सिजन अभावी काही जणांना आपला जीव गमवावा लागतो. शहरात काही ठिकाणी आॅक्सिजन सिलेंडर वापरतात हि गोष्ट महसुल प्रशासन व पोलीस प्रशासनाला मिळाली यानुसार तहसीलदार विशाल नाईकवाडे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने शहरातील सुमारे पस्तीस ठिकाणी धाडी टाकत पन्नास आॅक्सिजन सिलेंडर जप्त करत ताब्यात घेतले यातील दहा सिलेंडर भरलेले मिळाले याचा वापर आरोळे कोविड सेंटर साठी होणार आहे.
        चौकट
सध्या कोरोना महामारीची प्रचंड साथ आहे. त्यामुळे कोणीही खाजगी कामासाठी आॅक्सिजन सिलेंडर वापरू नयेत. आॅक्सिजन सिलेंडरचा वापर प्राधान्याने लोकांचा जीव वाचवणे हाच आहे. त्यामुळे कोणालाही खाजगी कामासाठी ते वापरता येणार नाहीत कोणालाही तशी परवानगी नाही.
(तहसीलदार विशाल नाईकवाडे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here