जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुका पुरवठा शाखेच्या तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण दक्षता समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित (दादा) पवार यांचे विश्वासू सहकारी हनुमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हनुमंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तसेच आमदार रोहित (दादा) पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत त्यांनी साकतचे सरपंचपदही पाच वर्षे सांभाळले होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी जामखेड तालुक्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. साकत गणात आमदार रोहित पवार यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्याच कामाची पावती म्हणून आमदार रोहित पवार यांनी त्यांची निवड जामखेड तालुका पुरवठा शाखेच्या तालुकास्तरीय सार्वजनिक वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समितीवर निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
कर्जत-जामखेडचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी यांच्या सह अनेक मान्यवरांनी हनुमंत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील देखरेखीत जनतेचा सहभाग राहण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने
दक्षता समिती स्थापन केली आहे यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत निर्धारित लक्ष्य पुर्ण करण्यासाठी शासनाने दक्षता समिती गठित केली आहे. हनुमंत पाटील यांच्या निवडीमुळे तालुक्यातील वितरण व्यवस्था अधिक सुरळीत होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.