जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मध्ये कोरोना पेशंट वाढल्यामुळे आॅक्सिजन बेड वाढविणे गरजेचे आहे या साठी प्रशासनाने जामखेड शहरातील भुसार व्यापारी आसोशियनला विश्वासात घेत सामाजिक जाणिवेतून भुसार व्यापारी वर्गाने पुढे होत एका तासात दोन लाख दहा हजार रुपये जमा झाले या सामाजिक दातृत्वाबद्दल भुसार व्यापारी व अधिकारी यांचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.
हजारो कोवीड रूग्णांवर मोफत उपचार करणार्या त्यांना जीवनदान देणार्या आरोळे कोविड सेंटर येथे ऑक्सिजन बेड क्षमता वाढविण्यासाठी प्रशासकीय अधिकारी तहसीलदार विशाल नाईकवाडे , गटविकास अधिकारी परसराम कोकणी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष रमेश जरे यांनी स्वतः फिरून व्यापारी वर्गाला विनंती केली. विनंतीस मान देत व्यापारी वर्गाने अवघ्या एका तासात दोन लाख दहा हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त रक्कम जमा झाली यामुळे आॅक्सिजन बेड वाढविण्यास मदत होईल अनेक कोरोना रूग्णांचा जीव वाचेल.

प्रशासनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत भुसार
व्यापारी वर्गाने दातृत्वाचा दाखला दिला आहे. अशाच प्रकारे सहकार्य सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृृतिक,
व्यापारी नागरिकांनी पुढे येऊन या कोवीड सेंटरला यथाशक्ती मदत करावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देणारे दानशूर व्यापारी व त्यांनी दिलेली रक्कम पुढील प्रमाणे

हमीद ट्रेडर्स – एकतीस हजार रुपये, राहुल बेदमुथा – पंचवीस हजार रुपये, कुमटकर अॅड मेंगडे – बारा हजार रुपये, वैभव ट्रेडर्स – अकरा हजार रुपये, जे. के. ट्रेडर्स
अकरा हजार रुपये, जहिर ट्रेडर्स – दहा हजार रुपये, रामहरी ट्रेडर्स – सात हजार शंभर, रमेश जरे – पाच हजार शंभर रुपये, अशोक टेड्रर्स – पाच हजार शंभर रुपये, सुभाष भंडारी – पाच हजार शंभर रुपये, सुनिल उगले – पाच हजार शंभर रुपये, नितीन पारेख – पाच हजार शंभर रुपये, विनोद नवले – पाच हजार रुपये, प्रविण बाफना – पाच हजार रुपये, आबुशेठ बोरा – पाच हजार रुपये, बबन पवार – पाच हजार रुपये, काका नेटके – पाच हजार रुपये, बाळासाहेब जरे – चार हजार शंभर रुपये, संतकृपा ट्रेडर्स – तीन हजार शंभर, मारूती काळदाते – दोन हजार पाचशे, महेश ट्रेडर्स – दोन हजार शंभर रुपये, रावसाहेब आजबे – दोन हजार रुपये, संतोष बोरा – दोन हजार रुपये गणेश भळगट दोन हजार रुपये, डी. बी. पवार – दोन हजार शंभर रुपये, हनुमान ट्रेडर्स – दोन हजार शंभर रुपये, अमोल चानोदिया – दोन हजार रुपये, संदिप दहिकर – दोन हजार रुपये, रावसाहेब नेटके – दोन हजार रुपये, राजेंद्र सांगळे – दोन हजार रुपये, आनंद ट्रेडर्स – दोन हजार रुपये, भरत पाटील – दोन हजार रुपये, संजय टेकाळे – एक हजार रुपये, एवन ट्रेडर्स – एक हजार रुपये, काका भळगट – एक हजार रुपये, सुराणा – एक हजार रुपये, बाळासाहेब बोरा – एक हजार रुपये, निलेश बोरा – एक हजार रुपये, सुशिल बेदमुथा – एक हजार रुपये, संदिप भंडारी – एक हजार रुपये, विनोद बोरा – एक हजार रुपये, सचिन भंडारी – एक हजार रुपये, संजय चौभारे – पाचशे रुपये यांच्या व्यतिरिक्त आणखी काही व्यापारी वर्गाने परत मदत केली आहे. अशा प्रकारे दानशूर व्यापारी मंडळींनी आरोळे कोविड सेंटरला आॅक्सिजन सिलेंडर साठी दोन लाख दहा हजार रुपयांची मदत केली आहे. हि मदत भुसार व्यापार्यांनी प्रशासनाकडे सपुर्त केली याामुळे अनेक कोरोना रूग्णांचा जीव वाचणार आहे या मदतीमुळे आरोळे कोविड सेंटरला मदत होणार आहे. अशाच प्रकारे परिसरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन आरोळे कोविड सेंटर व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपापल्या परीने मदत करावी.