जामखेड न्युज——
शिक्षक बँकेच्या स्वीकृत संचालकपदी मिनाज शेख यांची निवड
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या स्विकृत संचालकपदी श्रीरामपूर नगर पालिकेतील शिक्षिका शेख मिनाज ताजमोहम्मद यांची निवड करण्यात आली.संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या मासिक सभेमध्ये ही निवड करण्यात आली.
शिक्षक बँकेच्या तीन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाचे वीस संचालक निवडून आले होते तर श्रीमती शेख यांचा पराभव झाला होता. त्याचवेळी जिल्ह्यातील सर्व गुरुमाऊली व आघाडी प्रेमींनी त्यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्याची मागणी केली होती.
याबाबत गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई आढाव, जिल्हाध्यक्ष अंजली मुळे, उच्चधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे,पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष राम वाकचौरे, तंत्रस्नेही मंडळाचे जिल्हाध्यक्ष जयेश गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र गजभार तसेच मित्र पक्षाचे दिनेश खोसे, बाळासाहेब कदम, एल पी नरसाळे, शरद वांढेकर, प्रवीण शेरकर, मुकेश गडदे, राजेंद्र विधाते, फयाज शेख, हनिफ शेख आदि पदाधिकाऱ्यांशी तसेच गुरुमाऊली मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला व संचालक मंडळाला तसे आदेश दिले.
शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत बँकेचे चेअरमन संदीप मोटे यांनी हा प्रस्ताव सभेपुढे ठेवला. त्यास सर्व संचालकांच्या अनुमतीने मान्यता देण्यात आली. श्रीमती मिनाज शेख यांचे नाव श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सरोदे यांनी सुचविले तर कर्जतचे संचालक बाळासाहेब तापकीर यांनी त्यास अनुमोदन दिले.
निवडीनंतर श्रीमती शेख यांचा गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, चेअरमन संदीप मोटे, व्हाईस चेअरमन कैलास सारोक्ते, माजी चेअरमन सलीमखान पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सदगीर, सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे, बाळासाहेब कापसे, कैलास सहाणे, भाऊसाहेब दातीर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, बेगू पटेल,अयाज शेख व सर्व संचालक यांनी सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी सांगितले कि निवडणुकीमध्ये आपली आघाडी निवडून आली. परंतु मीनाज मॅडम यांचा पराभव झाला. याचे शल्य सर्वांना होते. त्यांनी मंडळासाठी अतिशय हिरीरीने कार्य केलेले आहे आणि म्हणून त्यांना संधी दिल्याने आता आपल्या मंडळाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. या कामी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, नेते, आघाडीचे सर्व नेतेमंडळी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी आपल्या मनोगतामध्ये गुरुमाऊली मंडळ हे शब्द पाळणारे मंडळ आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे .बापूसाहेब तांबे सर्वांना सोबत घेऊन या जिल्ह्यातील शिक्षकांच्या हिताचा कारभार करीत असल्याचे सांगितले.जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र सदगीर यांनी श्रीमती शेख यांच्या निवडीच्या निमित्ताने गुरुमाऊली मंडळ कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देत नाही याची पावती मिळाल्याची सांगितले तर ऐेक्य मंडळाचे संचालक कल्याण लवांडे यांनी आघाडीच्या नेतेमंडळींनी घेतलेला हा एक योग्य निर्णय आहे. यामुळे आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये देखील आनंद पसरला आहे असे सांगितले.
गुरुमाऊली मंडळ व आघाडी पारदर्शीपणे कारभार करणार असून प्रत्येक मीटिंगमध्ये घेतलेले योग्य निर्णय ही त्याची पावतीच आहे. आजच्या मासिक सभेत ही एका महिला भगिनीला दिलेला न्याय ही त्याचीच पावती असल्याचे संघाचे सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे यांनी सांगितले.
श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सरोदे यांनी मंडळाने श्रीमती मिनाज शेख यांची स्वीकृत संचालकपदी निवड केल्याबद्दल तालुक्याचे वतीने सर्वांचे आभार मानले.या प्रसंगी जिल्ह्यातील गुरुमाऊली मंडळाचे प्रमुख नेते, बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
शिक्षक बँकेच्या स्विकृत संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती शेख यांचे जिल्ह्यातून गुरुमाऊली मंडळ, शिक्षक भारती, एकल मंच, परिवर्तन मंडळ, उर्दू शिक्षक संघटना आदींच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.