जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
सध्या कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लाॅकडाउन व नियमावली जाहीर केली आहे. अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरतात गर्दी करतात तेव्हा जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे जनतेला संदेश दिला आहे.घराबाहेर पडू नका, गर्दी करणे टाळा, लाॅकडाउनचे नियम मोडण्यासाठी तुम्हाला पळवाटा सापडतील पण जर कोरोना पॉझिटिव्ह झालात तर हाँस्पीटल मध्ये बेडही मिळणार नाही, इंजेक्शन मिळणे कठीण होईल ती वेळ आपल्यावर व आपल्या प्रियजनांवर येऊ नये म्हणून शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करा असा संदेश व्हिडिओ क्लिप द्वारे संभाजी गायकवाड यांनी जनतेला दिला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या वेगाने प्रसारित होत आहे. गेल्या वर्षी घरातील एखादा व्यक्ती पाॅझिटिव्ह आसायचा आता संपुर्ण कुटुंब पाॅझिटिव्ह निघत आहे. प्रचंड रूग्ण संख्या वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात सध्या बेड शिल्लक नाहीत. इंजेक्शनही मिळत नाही, आॅक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे शासनाने कोरोना साखळी तोडण्यासाठी लाॅकडाउन केले आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्क व सॅनिटायझर वापर नियमितपणे करावा, गर्दी करू नये.
सध्या लाॅकडाउन आसतानाही अनेक लोक विनाकारण रस्त्यावर गर्दी करतात रस्त्यावर अनेक ठिकाणी पोलीस व अन्य कर्मचारी नियुक्त असुन आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना सहकार्य करा लाॅकडाउनचे नियम मोडण्यासाठी तुम्हाला पळवाटा सापडतील मात्र एकदा का पाॅझिटिव्ह झालात कि, हाॅस्पिटलमध्ये बेड व इंजेक्शन मिळणे कठीण होईल ती वेळ आपल्यावर व आपल्या प्रियजनांवर येऊ नये म्हणुन शासनाचे नियम पाळा अशी साद त्यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे जनतेला घातली आहे. ही क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे जनतेला ती चांगलीच भावली आहे.