जामखेड न्युज——
वै. रामचंद्र बोधले महाराज मंदिराचा पायाभरणी शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न
प्रा. अरूण वराट व इतर ग्रामस्थांच्या हस्ते शुभारंभ
जामखेड तालुक्यातील साकत येथे वै. रामचंद्र बोधले महाराज मंदिराचा पायाभरणी शुभारंभ माजी चेअरमन तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक प्रा. अरूण वराट तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
साकत हे गाव परिसरात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. येथे विठ्ठल मंदिरात रामचंद्र बोधले महाराज यांनी सुरू केलेले विना वादन व अखंड नंदादीप ६८ वर्षापूर्वी सुरू केले ते अद्याप सुरू आहे. रामचंद्र बोधले महाराज हे गुरू घराणे आहे. गावत वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह होतो याचे संपुर्ण नियोजन हभप उत्तम महाराज वराट हे करत असतात. आता त्यांच्याच संकल्पनेतून गावात रामचंद्र बोधले महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर पायाभरणी शुभारंभ प्रा. अरूण वराट व इतर ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी हभप उत्तम महाराज वराट, साकत सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, हभप उत्तरेश्वर महाराज वराट, माजी सरपंच महादेव मुरूमकर, हरीभाऊ मुरूमकर, गणेश वराट, प्रा. महादेव वराट, बाळासाहेब वराट, अविन लहाने, भाऊसाहेब मुरूमकर, दादासाहेब लहाने, राम जावळे, युवराज वराट, प्रा. दादासाहेब मोहिते, दत्तात्रय वराट, रावसाहेब वराट, सोपान वराट, ज्ञानदेव वराट, दिपक अडसूळ,फौजी भरत वराट, नवनाथ वराट, रामकिसन लोहार, सुनील भालेराव, डॉ. राम वराट, गोविंद वराट, किसन वराट, नागनाथ अडसूळ, रामकिसन लहाने, सोपान लहाने, काशिनाथ जावळे, वसंत मुरूमकर, बबलू वराट, छगाताई पुलवळेपुलवळे यांच्या सह भाविक भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज शुक्रवार दि. ३० रोजी सकाळी ९.३० वाजता वै. रामचंद्र बोधले महाराज मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.