जामखेड न्युज——
राजुरी ग्रामपंचायतमध्ये महिला राज
राजुरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती नानासाहेब खाडे यांची निवड
नुकत्याच पार पडलेल्या राजुरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी सागर कोल्हे यांनी निवड झाली होती आज पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती नानासाहेब खाडे यांची निवड झाली यामुळे ग्रामपंचायत वर महिला राज आले आहे.
आज दि. २९ रोजी पार पडलेल्या उपसरपंच निवडणूकीत भाजपतर्फे विशाल अशोक चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कीर्ती नानासाहेब खाडे यांनी फार्म भरला होता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कैलास खैरे यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती खाडे यांना सहा तर भाजपाचे विशाल चव्हाण यांना पाच मते मिळाली यामुळे कीर्ती खाडे यांची उपसरपंच पदी निवड झाली निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य नेतृत्वापुढे भाजप घायाळ झाली
भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी निवडणुकीच्या काळात राजुरी मध्ये तळ ठोकून होते तरी सुद्धा गावातील सर्वसामान्य जनतेने कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ़े सोशल मीडिया प्रमुख काकासाहेब कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ कोल्हे यांनी योग्य ते नियोजन करून भारतीय जनता पक्षाची 15 वर्षांपासून असलेली सत्ता नेस्तनाबूत केली
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भाजपकडून माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या सौभाग्यवती वैशालीताई काळदाते तर राष्ट्रवादी काँग्रेस कडुन सागर कोल्हे यांच्या पत्नी सौ अश्विनीताई कोल्हे यांच्या मध्ये लढत झाली होती .या लढतीत सौ वैशालीताई काळदाते यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या पराभुत उमेदवार यांना 794 मते पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ आश्विनीताई सागर कोल्हे यांना 894 मते मिळाली आसल्याने सुमारे शंभर मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.
राजुरी मध्ये नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या तर चिट्टीमुळे भाजपाची एक जागा वाढली यामुळे
भाजपला पाच जागा मिळविता आल्या आहेत.
पण सरपंचाला दोन मतांचा अधिकार असल्याने उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती नानासाहेब खाडे या निवडून आल्या
राजुरी ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधील सर्वसाधारण जागेवरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या ठिकाणी गौतम आश्राजी फुंदे आणि मच्छिंद्र आश्रुबा फुंदे या दोन्ही उमेदवारांना समसमान 282 मते मिळाली होती. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या उपस्थितीत चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. श्रेया विजय भोरे या चिमुकल्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये गौतम फुंदे हे विजयी ठरले होते.
राजुरी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार अश्विनीताई सागर कोल्हे तर ग्रामपंचायत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख काकासाहेब कोल्हे यांच्या मातोश्री सुनिता मुकिंदा कोल्हे, मीनाक्षी संजय खाडे, किर्ती नानासाहेब खाडे, बाबासाहेब रामदास घुले असे सरपंच पदासह पाच जण विजयी झाले होते.
आज पार पडलेल्या उपसरपंच निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती नानासाहेब खाडे या निवडून आल्या. यामुळे ग्रामपंचायतवर महिला राज आले आहे. सरपंच पदी अश्विनी सागर कोल्हे तर उपसरपंच पदी कीर्ती नानासाहेब खाडे यांची निवड झाली आहे.