जम्बो कोविड सेंटरच्या स्वच्छतेसाठी प्रविण उगले कडून डस्टबीनचे वाटप

0
180
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट.) – 
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटर मध्ये आमदार रोहित पवार यांनी 400 बेड चे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे या कोविड सेंटरच्या स्वच्छतेसाठी प्रविण उगले यांच्या कडून डस्टबीनचे मोफत वाटप करण्यात आले यामुळे कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल.
      याप्रसंगी आरोळे कोविड सेंटरमधील सुलताना भाभी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रविण (दादा)उगले, कृषी भूषण रवींद्र कडलग, मयुर भोसले सर, महेश यादव, लखन राळेभात,आमीर शेख, शशी म्हेत्रे आदी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना प्रवीण ऊगले म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीच्या दुसर्‍या  लाटने सगळीकडे खळबळ माजली आहे तसेच लोक भित आहेत या कोरोनाला न घाबरता यावर कशी मात करता येईल अशी यंत्रणा जामखेड येथे आरोळे हॉस्पिटल& कोविड सेंटर येथे आहे. याला परत सपोर्ट म्हणून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी 16 एप्रिल रोजी चारशे बेडचे जम्बो कोविड सेंटर चालू केले. यामुळे कोरोना रूग्णांची सोय होणार आहे. जनतेने घाबरू नये कोरोना ची टेस्ट करून घ्यावी तसेच कोरोना पॉझिटिव आल्यास स्वतः क्वारंटाईन होऊन शासनाला मदत करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here