जामखेड न्युज——
जामखेड सकल जैन समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढून शहर बंद ठेवन झारखंड सरकारचा केला निषेध
जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असलेल्या झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज दि २१ डिसेंबर रोजी सकल जैन समाज जामखेडच्या वतीने जामखेड शहरात बंद पाळण्यात आला. यावेळी शहरातील जैन स्थानक येथुन तहसील कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढुन नंतर तहसीलदार यांना जैन समाज्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
झारखंड मधिल श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर जैन समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी बंदचे आयोजन केले होते .याच अनुषंगाने जामखेड येथील सकल जैन समाज जामखेडच्या वतीने देखील जामखेड बंद ठेवण्यात आले आहे. या बंद मध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला होता. दरम्यान, शहरातून सकाळी साडेदहा वाजता जामखेड शहरातील जैन स्थानक येथुन जैन समाज्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मेन रोड ,शनी चौक ,जयहिंद चौक ,बीड कॉर्नर मार्गे तहसील कार्यालयावर जाऊन धडकला.या ठिकाणी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सकल जैन समाज सह अनेक नागरिकांच्या सह्या होत्या.
निवेदन देता वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा .मधुकर आबा राळेभात, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले, आकाश बाफना, अशोक शिंगवी, शरद शिंगवी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की केंद्र सरकार हे धर्माच्या बाबतीत अधिक जागृत आहे .त्यामुळे झारखंड सरकारने पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केलेला निर्णय रद्द करून तीर्थक्षेत्रच ठेवावे. झारखंड सरकारने या धार्मिक स्थळाचे पावित्र्य कमी करु नये .आम्ही आज जामखेड शहरात शांतता व अहिंसा मार्गाने मोर्चा काढला आहे. पर्यटन स्थळ करणे चुकीचे आहे याचा आम्ही निषेध करतो तसेच हा निर्णय रद्द करवा अशी मागणी सकल जैन समाज्याच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी निवेदन स्विकारतावेळी सांगितले की जामखेड सकल जैन समाज्याच्या वतीने माझ्याकडे निवेदन प्राप्त झाले आहे .त्यांच्या मागणीचा विचार करून जैन समाज्याच्या भावना शासनापर्यंत पोहचवण्यात येतील असे अश्वासन दिले.