भावाने फसवलेल्या अंध झोडप्याच्या मदतीसाठी सरसावले अँड अरूण आबा जाधव —-प्रसंगी काळा कोट घालून अंध झोडप्याला न्याय मिळवून देणारच

0
205

जामखेड न्युज——

भावाने फसवलेल्या अंध झोडप्याच्या मदतीसाठी सरसावले अँड अरूण आबा जाधव

—-प्रसंगी काळा कोट घालून अंध झोडप्याला न्याय मिळवून देणारच

आपण ज्या देशात राहतो त्या देशाला अनेक महापुरुषांचा, साधू संताचा, देश भक्तांचा,प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या जडणघडण उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. अनेक जण फासावर गेले आयुष्याचा त्याग केला. विचाराच्या वाणीतून येथील गोरगरीब कष्टकरी शोषित वर्गांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी रात्र दिवस प्रयत्न केले.गरिबावर कोणी अन्याय करू नये कोणी कोणाला त्रास देऊ नये कोणीच कोणावर अत्याचार करू नये भेदभाव करू नये असे साधुसंत म्हणतात. जे काही रंजले गांजले त्यास म्हणावे आपले देव असे असताना देखील गरीब हा गरीब होत चालला आहे. श्रीमंत श्रीमंतच होत चालला आहे. श्रीमंता कडून गरिबाचं मानसिक शारीरिक शोषण होत आहे.एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली लेकरे सुद्धा संपत्तीसाठी व स्वार्थासाठी खून करीत आहे. महिला,अंधअपंग, दुर्बल,कष्टकरी शेतमजूर,वंचित घटकावर रोज अन्याय अत्याचार माणुसकीला काळिंबा फासणारा होत आहे. अशीच घटना होत आहे.

अशीच एक करून कहाणी अंध झोडप्याची हा परिवार जामखेड तालुक्यातील खांडवी येथे आप्पा चव्हाण ह्या गरीब कष्टकरी कुटुंबातील माणसाला जन्मताच दोन्ही डोळ्यांनी अपंगत्व आहे. त्याची पत्नी देखील अंध आहे. जोडप्यांना एकत्रित तीन भावात 22 एकर जमीन आहे. तिघे जण भाऊ आहेत.त्यातील एका भावाने जमिनीची खाते फोड करून जामखेड येथील खरेदी खताच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले व खाते फोड न करता जमीन अंधपणाचा फायदा घेऊन त्याच्या हिश्याची सात एकर जमीन भावांनी त्यांच्या नावावर लावून घेतली.आप्पा चव्हाण व त्याची पत्नी अंध असल्यामुळे त्यांच्या अंधपणाचा फायदा घेऊन जमीन त्यांच्या भावाने स्वतःच्या नावावर करून घेतली त्यांना असणार एक लेकरू त्याचे देखील वेगवेगळ्या पद्धतीने हाल करीत आहे.ही सर्व परिस्थिती जामखेड शहरातील एका हातगाडा चालवणाऱ्या व्यक्तीला आप्पा चव्हाण सांगितले तेव्हा त्या व्यक्तीने तुला एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो तो म्हणजे गोरगरीब,कष्टकरी,अनाथ,वंचित विधवा, परितक्ता यांच्या बाजूने निर्भीडपणे कोणालाही न घाबरता काम करणारा अरुण आबा आहे. त्याना तू जाऊन निश्चित भेट न्याय तेथेच मिळेल हे दाम्पत्य दोघे अंध असतानी आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या साह्याने ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या ऑफिसला आले व सर्व हकीगत सांगितली ही हकीगत सांगताना त्यांच्या डोळ्यातून दुःखाच्या व अत्याचाराच्या पाण्याच्या धारा वाहत होत्या मी पहात होतो आबा त्यांना समजून सांगत होते. तातडीने ॲड.नितीन घुमरे या वकिलांशी चर्चा करून संबंधित प्रकरण मध्ये लक्ष घालून न्याय द्यावी अशी विनंती केली.

आप्पा तुम्ही घाबरू नका कोणी जरी तुमच्या बाजूने उभा नाही राहिले तर मी काळाकोट घालून कोर्टात कायद्याची लढाई लढेन व काळा कोट काढून रस्त्यावरची लढाई लढेल हे वाक्य ऐकल्यावर आप्पा व त्यांची पत्नी शांत झाले व जाता जाता म्हणाले मी अभंग चालू असतानी मृदुंग टाळ वाजवतो तुकाराम ज्ञानेश्वर विठ्ठल यांचा जय करतो त्या सेवेचे फळ म्हणून अरे विठ्ठल भेटला !!रे विठ्ठल भेटला!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here