जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग विद्यालयाच्या संघाने पटकावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ल.ना. होशिंग माध्य.व उच्च विद्यालयाच्या मुलांच्या 14 वर्षीय कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता हा संघ विभागीय पातळीवर खेळणार आहे.

ल.ना. होशिंग विद्यालयाच्या खेळाडूंनी जामखेड तालुक्याचे नेतृत्व करत असताना कर्जतच्या नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय कुळधरण या संघाला २५-११ गुण फरकाने एकतर्फी मात दिली. ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रणव कदम, अभिषेक टकले, स्वप्निल शिंदे, यशराज कुमटकर, अमर कापसे, प्रवीण शिंदे, काशिनाथ टेकाळे, सोहम टेकाळे, देवानंद राऊत, माऊली कोरडकर, यशराज सानप, प्रतीक मुळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून दिला.
त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री राघवेंद्र धनलगडे सर, श्री प्रल्हाद साळूंके सर, श्री साहेबराव जरे सर,श्री धीरज पाटील सर,राम हुलगुंडे सर सर्वशिक्षक व विद्यार्थी यांचं प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग,
उपमुख्याध्यापक श्री रमेश आडसूळ, उपप्राचार्य श्री पोपट जरे, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे यांनी अभिनंदन केले.त्याचबरोबर दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री उद्धवरावजी देशमुख उपाध्यक्ष श्री अरुणशेठ चिंतामणी सेक्रेटरी श्री शशिकांत देशमुख, सहसचिव श्री दिलीपशेठ गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.






