जामखेड न्युज——
आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य खपून घेतले जाणार नाही…..ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव
दि . 02/12/2022 वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली खर्डा चौक जामखेड येथे पनवेलचा तडीपार गावगुंड जग्या गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.डॉ. अरुण आबा जाधव म्हणाले की जामखेड तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर जगणारी जनता मला वाटले की आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामकी केल्यानंतर जामखेड येथील आंबेडकर प्रेमी रस्त्यावर उतरेल परंतू दुर्दैव एवढेच की जामखेड तालुक्याच्या राजकारणाला इथल्या आमदार खाजदार व पुढार्याच्या दबावाला बळी पडून गुलाम बनून बाहेर येत नाही.
पनवेलचा तडीपार गावगुंड जग्या गायकवाड याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानक वक्तव्य केल्यामुळे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्याला ताबडतोब अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अवैध मार्गाने कमावलेली जागा मालमत्ता संपत्ती व बँक अकाउंट याची डिटेल्स खात्री सखोल चौकशी होऊन अवैद्य मार्गाने मिळालेल्या संपत्तीचे ऑडिट करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. मीडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असून या व्हायरल क्लिपमुळे ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने आज जामखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन केले.
बापू ओहोळ म्हणाले की आदरणीय ॲड.प्रकाश आंबेडकरांचा अपमान म्हणजे बहुजन समाजाचा अपमान आहे.
यावेळी,अतिश पारवे,विशाल पवार,सर्जेराव पाटील ,सचिन सदाफुले,सुरेश जाधव, अंकुश पवार,प्रमोद तुपिरे,लतिफ भाई,प्रवीण बेलेकर,अमरनाथ डोंगरे,कल्याण आव्हाड,विशाल आव्हाड,सुरेश आव्हाड भिमराव शेगर ,विशाल शिंदे,अझरभाई काझी,प्रकाश शिंदे, मच्छिंद्र जाधव,राजेश ओहोळ,सूरज बिरलिंगे,शिवाजी पवार,दिपक गव्हाळे, सचिन भिंगारदिवे,राजू शिंदे,अतुल ढोणे,संतोष चव्हाण सोनेगाव उपस्थित होते व सर्वांचे आभार भीमराव चव्हाण यांनी मानले.