अनाधिकृत आकड्यांमुळे ट्रान्सफार्मर जळाल्याने खर्डा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आकडेधारकांवर ग्रामपंचायतीने कारवाई करावी

0
196

जामखेड न्युज——

अनाधिकृत आकड्यांमुळे ट्रान्सफार्मर जळाल्याने खर्डा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
आकडेधारकांवर ग्रामपंचायतीने कारवाई करावी

खर्डा शहर पाणीपुरवठ्याची डीपी सतत जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत,
सातेफळ येथील डीपी वर अनधिकृत कनेक्शनचा मुळे खर्डा वासियांना फटका..
खर्डा ग्रामपंचायतने कारवाई करावी ग्रामस्थांची मागणी—

याबाबत माहिती अशी की, खर्डा शहराला सातेफळ येथील खैरी मध्यम प्रकल्पावरून पाणीपुरवठा होत आहे. या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र 63 एच.ची. डीपी बसविण्यात आली आहे, या ठिकाणी खर्डा ग्रामपंचायतने 25 एच.पी. ची मोटर बसवली आहे तर सातेफळ ग्रामपंचायत ने 10 एच.पी. ची मोटर याठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी बसवली आहे, परंतु खर्डा शहराच्या डीपीवर सातेफळ येथील ग्रामस्थांनी अनधिकृत कनेक्शन घेऊन स्वतःच्या शेतीपंपासाठी मोटारी बसवली आहे.

त्यामुळे खर्डा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या डीपीवर अनेक वेळा लोड येऊन सदरची डीपी आतापर्यंत सतरा वेळा जळाली आहे.
याबाबत खर्डा ग्रामपंचायत कडून सदर अनधिकृत कनेक्शन घेतलेल्या लोकांवर कारवाई केली जात नाही,असा आरोप होत आहे, सदरची डीपी वारंवार जळत असल्याने खर्डा शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येत असून खर्डा शहरामध्ये वेळोवेळी संतापाची लाट उसळल आहे,खर्डा ग्रामपंचायतची सदस्य संख्या 17 असताना हीच पाणीपुरवठ्याची डीपी अनेक वेळा जळत असताना ग्रामपंचायचे पदाधिकारी हात चोळून का बसत आहेत, हाच प्रश्न खर्डा ग्रामस्थांना पडला आहे?

सदरची डीपी पुन्हा तीन दिवसांपूर्वी अनधिकृत कनेक्शनच्या फटक्याने पुन्हा जळाली आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने तळ्यात पाणी भरपूर असूनही खर्डा शहराच्या पाणीपुरवठ्यावर यामुळे ताण येत आहे. खर्डा ग्रामस्थ या डीपी जळाल्याच्या कटकटीला वैतागून गेले आहेत,त्यामुळे वेळीच मार्ग न निघाल्यास खर्डा ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.


–चौकट —
खर्डा ग्रामपंचायतने विज वितरण कंपनीकडे लेखी मागणी करून सदरचा अनधिकृत कनेक्शन करण्यावर कारवाई करावी अशी लेखी मागणी केली आहे, परंतु याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तसेच डीपी जळल्यानंतर ग्रामपंचायतने आतापर्यंत प्रत्येक वेळी 13 हजार रुपये रुपयाचा भरणा हा डीपी साठी वीज वितरण कंपनीकडे केला आहे. लवकरच खर्डा शहराचा पाणीपुरवठा सुरू होईल
ग्रामविकास अधिकारी
प्रशांत सातपुते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here