ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

0
161

जामखेड न्युज——

ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एच यु गुगळे चारिटेबल ट्रस्ट जामखेड आयोजित चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग,स्पर्धेचे उद्घाटक उद्योजक रमेशशेठ गुगळे, समृद्धी मिल्क प्रोडक्शनचे प्रमुख वैभव कुलकर्णी,
उपमुख्यद्यापक रमेश अडसूळ,पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या हस्ते रमेशशेठ गुगळे यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ यांच्या हस्ते समृद्धी मिल्क प्रोडक्शनचे प्रमुख वैभव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कलाशिक्षक राऊत मुकुंद यांनी स्पर्धेची माहिती दिली.

चित्रकला स्पर्धा 2003 ला सुरू होऊन हे 19 वे वर्ष आहे. या चित्रकला स्पर्धा सातत्याने अतिशय व्यवस्थित सुरू आहेत.या स्पर्धा द्वितीय सत्रामध्ये संपूर्ण दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेतील सर्व शाखा ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड,श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव,श्री साकेश्वर विद्यालय साकत,श्री इंग्लिश स्कूल विद्यालय राजुरी स्पर्धा घेण्यात येतात. या चारही शाखेतील सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

चारही शाखांमधून इयत्ता पाचवी ते सातवी इयत्ता आठवी ते दहावी दोन गटांमध्ये स्पर्धा घेतली जाते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट जामखेड वतीने देण्यात येते. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेची संधी मिळते त्याबद्दल श्री रमेशशेठ गुगळे यांचे आभार व्यक्त केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री रमेशशेठ गुगळे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पूर्वीची शाळा व आत्ताची शाळा यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे.स्पर्धेचे युग आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही एका कलेची आवड असावी. अभ्यासासोबत प्रामाणिकपणा,कामातील नीटनेटकेपणा,योग्य नियोजन,कठोर परिश्रम या गोष्टींमुळे आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये प्रगती करता येते,ती विद्यार्थ्यांनी करावी आपला भाग ग्रामीण आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन आपले व तालुक्याचे नाव उंच करावे असे सांगितले व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत होशिंग साहेब यांनी सर्व बालचित्रकारांना प्रथम शुभेच्छा देऊन रंगरेषा द्वारे आपल्या मनातील विचार चित्रातून व्यक्त करा व आपण कोणत्याही गोष्टीकडे पाहताना त्यात एक नवा दृष्टिकोन असावा असे सांगितले व विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री रमेश शेठ गुगळे यांचे विद्यालयाचे वतीने आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी श्रीमती संगीता दराडे,सुप्रिया घायतडक,वंदना अल्हाट, पूजा भालेराव,रेश्मा कारंडे, सुरेखा धुमाळ,प्रियंका सुपेकर, प्रभा रासकर, देविका फुटाणे, सर्व मॅडम यांनी कार्यक्रमाचे अतिशय व्यवस्थित नियोजन केले. समारंभ प्रमुख श्री नरेंद्र डहाळे शिक्षक प्रतिनिधी रोहित घोडेश्वार सर्वांनी काम पाहिले. ईश्वर कोळी भाऊसाहेब व रामचंद्र होशिंग भाऊसाहेब तसेच कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here