जामखेड न्युज——
शिष्यवृत्ती परिक्षेत हनुमान वस्ती शाळेचे घवघवीत यश
शिष्यवृत्ती परिक्षेत सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हनुमान वस्ती जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरले आहेत यामुळे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे काही महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 2022परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती शाळेतील सार्थक दादासाहेब ढवळे, अनुष्का दीपक ढवळे, प्रतिक भरत ढवळे, अविराज विजय ढवळे, बापू बाबासाहेब गोरे, रोहित सुनील ढवळे,
या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त करून पात्र झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. आज पर्यंत शाळेस वेळोवेळी मदत केलेल्या सर्व पालकांच्या सहकार्याने, केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने व दोन्ही शिक्षकांच्या प्रयत्नांच्या पराकष्ठेतून शाळेने हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे….. याबद्दल शाळा पालक विद्यार्थी,अधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शिष्यवृत्ती परिक्षेतील यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक विजय चव्हाण व बायको बापू यांचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच पालक यांनी अभिनंदन केले आहे.