जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दिडवर्षांहून अधिक कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील तसेच सबंध महाराष्ट्रातील, बँड वाले, ढोलकीवले, पेटी वाले, तबला वाले, बँजो वाले, वाघ्या मुरळी, बहुरूपी, तमाशा कलाकार, नाटककार आदी लोककलावंत तसेच इतर कलाक्षेत्रातील कलाकारांचे लॉकडाऊन मुळे अतोनात हाल झाले आहेत. शासनाच्या विविध नियमावलीमुळे कलाकारांची उपासमार होत आहे. याबाबत ५ एप्रिल रोजी जामखेड तहसील कार्यालय येथे वंचीत बहुजन आघाडीचे भटके-विमुक्तांचे नेते अँड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली लोककलावंतांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
“यावेळी नगरसेवक गुलशन अंधारे, सामाजिक कार्यकर्ते मच्छीन्द्र जाधव, विशाल जाधव, सनी जाधव, बाबा जाधव ,संतोष पवार, रवी अंधारे, मुकुंद घायतडक, अनिल पवार व लोककलावंत उपस्थित होते.
“कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने सतर्क होऊन कडक निबंध लादून लॉकडाऊन सदृष्य परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोना महामारी गेली वर्षभरापासून चालू आहे. या महामारीमुळे वर्षभरापासून हाहाकार माजला आहे. त्यात अशा जुलमी निर्णयामुळे लोककलावंतांची उपासमार होणार आहे. त्यामुळे लोककलावंत,कला केंद्र,बँजो वाले,गोंधळी ,ढोलकी वाले, पेटीवले, गायक इतर लोककलावंत यांना शासनाच्या या लॉकडाउन सदृश्य नियमा मधून वगळण्यात यावे अशी मागणी अँड.डॉ. अरुण जाधव यांनी केली.
“तसेच शासनाला जर लॉकडाऊनची गरज भासत असेल तर सर्व लोककलावंतांच्या कुटुंबाला एक महिना लागणारे अन्नधान्य व प्रत्येकी 20 हजार रुपये मदत करण्यात यावी.अशी भूमिका अँड.डॉ जाधव यांनी मांडली.
“तालुका प्रशासनच्या वतीने तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी निवेदन स्वीकारले,व आपल्या मनोगतात लोककलावंताच्या भावना शासनापर्यंत पोहचवण्यात येतील अशे आश्वासन दिले. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.