जामखेड प्रतिनिधी
प्लॉट घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये व पतीच्या संबंधाबाबत विचारल्याच्या कारणाने साकत येथील विवाहितेचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे जामखेड पोलीस स्टेशनला सासरकडील पती सह चार जणांविरोधात हुंडाबळी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती शिवप्रसाद चंद्रकांत पाटील, सासू कंपनबाई चंद्रकांत पाटील, दीर उमेश चंद्रकांत पाटील व जाव राणी उमेश पाटील सर्व रा. साकत ता. जामखेड अशी चार आरोपींची नावे आहेत.
मयत महीलेचा भाऊ ज्ञानेश्वर हनुमंत चव्हाण वय 28 वर्ष रा. सावरगाव ता.जामखेड याने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादत म्हंटले आहे की, फिर्यादीची बहिण मयत रेषमा शिवप्रसाद पाटील ही तिच्या सासरी साकत येथे नांदत होती. दरम्यान वरील आरोपींनी दिनांक ४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी सातच्या सुमारास फिर्यादीची बहिण रेषमा हिला माहेरुन प्लाॅट घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली हे पैसे मिळत नाहीत व आपल्या पतीचा कोणत्या तरी बाईशी संबंधांबद्दल मयत रेश्मा हिणे विचारले असता वरील आरोपींनी तिस शिवीगाळ व मारहाण करून उपाशी ठेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करूण तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे अशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केल्यावरून वरील चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचा पती शिवप्रसाद चंद्रकांत पाटील यास पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर व्ही थोरात हे करत आहेत.