कर्जत-जामखेडमध्ये ५८ नवीन पोलीस पाटील पदे मंजूर, कर्जत मध्ये ३३ तर जामखेडमध्ये २५
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ कलम ५ (१) नुसार पोलीस पाटील हे पद प्रत्येक गांव / महसूल गावासाठी असावे. परंतु कर्जत-जामखेड या तालुक्यात नवीन तयार झालेल्या महसूली गावाला पोलीस पाटील हे पद अस्तित्वात नाही.
सदयस्थितीत कर्जत तालुक्यातील ११८ गावापैकी ७८ गावात पोलीस पाटील पद हे मंजूर आहे.
तर जामखेड तालुक्यात ८७ गावांपैकी ५२ गावात पोलीस पाटील पद हे मंजूर आहे.
कर्जत तालुक्यातील ११८ गावापैकी नगरपंचायत हद्दीतील ०४ गांवे तसेच पोलीस स्टेशन ०३ कर्जत,मिरजगांव, आणि राशीन येथे पोलीस चौकी अशी एकुण ०७ गांवे वगळता उर्वरित एकुण १११ गावामध्ये पोलीस पाटील पदे आवश्यक आहेत.
परंतु पूर्वीचे ७८ पदे अस्तित्वात असून नव्याने ३३ नवीन महसूली गावांना पोलीस पाटील पदनिर्मिती करावयाची आहे.
जामखेड तालुक्यातील ८७ गावापैकी नगरपंचायत हद्दीतील ०७ गांवे तसेच पोलीस स्टेशन ०३जामखेड, खर्डा, आणि नान्नज येथे पोलीस चौकी अशी एकुण १० गांवे वगळता उर्वरित एकुण ७७ गावामध्ये पोलीस पाटील पदे आवश्यक आहेत. परंतु पूर्वीचे ५२ पदे अस्तित्वात असून नव्याने २५ नवीन महसूली गावांना पोलीस पाटील पदनिर्मितीकरावयाची आहे.
अशी माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.