जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट.)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरला माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या शासनाने आरोळे कोविड सेंटरच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवणे गरजेचे आहे असे प्रा. राम शिंदे यांनी मत व्यक्त केले.
जामखेड तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. एकटय़ा दिघोळ गावात साडेतीनशे पेक्षा जास्त रूग्ण सापडले आहेत त्यामुळे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिघोळ व मोफत उपचार करणार्या आरोळे कोविड सेंटरला भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली तसेच सेंटरचे संचालक डॉ शोभा आरोळे व डॉ. रवी आरोळे यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या त्यावेळी लाईट गेल्यावर जनरेटर साठी डिझेल तसेच आॅक्सिजन याची कमतरता असल्याचे जाणवले तेव्हा मंत्री शिंदे यांनी सांगितले की मी जिल्हाधिकारी यांना भेटून या समस्या सोडविण्यासाठी त्यांना सांगणार आहे. शासनाने मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा देणाऱ्या सेंटरला मदत करावी सर्वसामान्य नागरिकांना खाजगी हॉस्पिटल परवडणारे नाही. असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अॅड प्रविण सानप, शहराध्यक्ष बिभिषण धनवडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, प्रविण चोरडीया, मनोज कुलकर्णी, सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे, डॉ. अल्ताफ शेख, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, गोरख घनवट, राजेंद्र म्हेत्रे, ईश्वर हुलगुंडे, आप्पासाहेब ढगे आदी उपस्थित होते.