शासनाचे नियम पाळा व कोरोनाला हारवा – कोरोना रूग्णासाठी शंभर बेडची तयारी चालू – आमदार रोहीत पवार

0
283
जामखेड प्रतिनिधी
    जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोनाची दुसरी लाट संक्रमित करणारी आहे. यामुळे बाधीत रूग्ण वाढले तर ऐनवेळी पळापळ करण्यापेक्षा आत्ताच येथे १०० बेडचे सेंटर डॉ. अरोळे हॉस्पिटललगत करण्याची तयारी चालू केली आहे. जास्त रूग्णसंख्या वाढण्यापेक्षा शासनाच्या नियमाचे पालन केले तर आपण कोरोनाला हारवू शकतो असे आवहान आ. रोहीत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
            आ. रोहीत पवार यांनी डॉ. अरोळे कोवीड हॉस्पिटलला भेट देऊन प्रशासन व डॉ अरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ रवी आरोळे व डॉ शोभा आरोळे यांची संयुक्त बैठक घेऊन सध्याच्या वाढत्या कोरोनाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी नवीन १०० बेड तयार करण्यात येत आहे त्या जागेची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, डॉ. अरोळे हॉस्पिटल एक वर्षापासून बाधीत रूग्णावर उपचार करत आहेत याबाबत लोकांच्या वतीने आभार व्यक्त केले.
       यापुढे बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले डॉ. अरोळे हॉस्पिटलला कोविडच्या काळात जितकी मदत करता येईल तेवढी केली आहे तसेच प्रशासन औषधे व बेड उपलब्ध करणे यासाठी मदत करत आहेत. एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध केल्या तर मनुष्यबळ योग्य पध्दतीने वापरता येईल त्यामुळे इतरत्र काही करण्यापेक्षा येथेच सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. याठिकाणी ३०० बेड उपलब्ध आहेत यातील ७० आँक्सीजनयुक्त आहेत. पाच व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत तसेच लोक इतर कारणाने अन्नधान्य व इतर मदत करत आहेत.
         सध्या जो स्ट्रेन आला आहे तो वेगाने पसरत आहे एक दोन लोकापुरता मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंब संक्रमित होत आहे त्याचे प्रमुख कारण लोक आवश्यक ती काळजी घेत नाही मास्क घालीत नाही, गर्दी कमी केली जात नाही, लग्न सोहळ्यात गर्दी जास्त होते. हे सर्व कमी होईल यासाठी शासनाच्या मदतीने आपण हे कंट्रोल करत आहोत हे सर्व कार्यक्रम कमी होतील किंवा मर्यादित राहतील व शासनाच्या नियमाचे पालन केले तर आपण कोरोनाला हारवू शकतो.
         लॉकडाऊन बाबत बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, राज्याचे म्हणने आहे पूर्णपणे लॉकडाऊन करून चालणार नाही कारण अनेक जणांचे हातावर पोट आहे त्यामुळे अडचणी येऊ शकतात पण लोक बेफिकीर वागू लागले तर कडक निर्बंध करावे लागणार आहे. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, डॉ. अरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोभा अरोळे, रवी अरोळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, राहुल उगले, राजेंद्र गोरे, ऊमर कुरेशी, ईस्माईल सय्यद, झुबेर शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here