पोलीस उपनिरीक्षक प्रकाशने मिळवलेले यश हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे – डॉ. भगवानराव मुरुमकर

0
261
जामखेड प्रतिनिधी
   जामखेड न्युज – (सुदाम वराट) 
  जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची सवय, संयम व आत्मविश्वासाच्या बळावर परिस्थितीवर मात करून यशाच्या शिखरावर जाता येते घरात अठरा विश्व दारिद्रय आसतानाही पोलीस उपनिरीक्षक प्रकाशने मिळवलेले यश हे आजच्या तरूणांसाठी प्रेरणादायी आहे असे मत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर यांनी व्यक्त केले
      सहा महिने आई वडील ऊसतोडणी जातात पण मुलगा प्रकाश नेमाने हा जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक झाला प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर तो गावी आला असता त्याचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉ. मुरूमकर बोलत होते. यावेळी ज्ञानदेव मुरुमकर, ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर, नागराज मुरुमकर, प्रतिक मुरुमकर, राम गायकवाड, ज्ञानेश्वर सानप, शत्रुघ्न वराट, शंकर मुरुमकर, रामदास लहाने, अमोल वराट, प्रथमेश मुरुमकर, बाळासाहेब नेमाने याच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणाले की, गावातील तरूणांनी प्रकाश नेमाने याचा आदर्श घ्यावा त्याने आई – वडीलांच्या कष्टाचे चीज केले आहे. स्वतः ही सुट्टीत ऊसतोडणी केली याही परिस्थितीत यश मिळविले गावातील तरूणांनी प्रकाशचा आदर्श घेऊन जिद्दीने अभ्यास करून यश संपादन करावे असे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन करताना सांगितले.
    मार्च 2019 मध्ये प्रकाशची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. नाशिक येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर तो गावी आला होता तेव्हा डॉ. भगवानराव मुरुमकर मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन केले होते.
   प्रकाश नेमाने हा पाचवी ते दहावी श्री साकेश्वर विद्यालय साकत चा विद्यार्थी होता चुलत भाऊ पोलीस उपनिरीक्षक झाला त्यापासून प्रेरणा घेऊन जिद्दीने प्रकाशही पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here